कॅनडाच्या संरक्षण मंत्रिपदी भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची निवड


विशेष प्रतिनिधी

टोरांटो – भारतीय वंशाच्या कॅनडाच्या राजकीय नेत्या अनिता आनंद यांची कॅनडाच्या संरक्षण मंत्री नियुक्ती झाली आहे. पंतप्रधान जस्टिन ट्र्युडू यांनी आनंद यांच्याकडे ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली. Anita Anand will Defense minister of Canada

अनिता आनंद यांचा जन्म १९६७ मध्ये स्कोटियामध्ये झाला. त्यांची आई सरोज या मूळच्या पंजाब, तर वडील एस. व्ही. आनंद तमिळनाडूचे आहेत. अनिता यांनी टोरांटो विद्यापीठात कायदा विषयाच्या प्राध्यापिका म्हणून काम केले आहे.



टोरांटोजवळील ओकव्हिलेमधून २०१९ मध्ये त्यांनी निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांना सार्वजनिक सेवा संबंधीच्या खात्याची जबाबदारी दिली होती.कॅनडाचे संरक्षण मंत्रिपद आधी भारतीय वंशाचेच हरजित सज्जन यांच्याकडे होते.

सैन्यातील लैंगिक गैरवर्तनाचे प्रकरण हाताळण्यास अपयश आल्याने सज्जन यांच्यावर टीका होत होती. त्यामुळे त्यांनी या पदावरून हटवून अनिता आनंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सज्जन यांना आता आंतरराष्ट्रीय विकास विभागाचे मंत्रिपद दिले आहे.

गेल्या महिन्यात येथे झालेल्या मुदतपूर्व निवडणुकीत ट्र्युडू यांचा लिबरल पक्ष दुसऱ्यांदा सत्तेवर आला. सैन्यदलातील सुधारणांवर अनिता आनंद यांचा भर असेल, असे सांगण्यात येत आहे.

Anita Anand will Defense minister of Canada

विशेष प्रतिनिधी

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात