Airthings Masters Chess Tournament :अभिमानास्पद ! भारताचा १६ वर्षीय ग्रँडमास्टर आर प्रग्यानंद – ३९ चाल -‘वर्ल्ड चॅम्पियन’ मॅग्नस कार्लसनचा पराभव…


भारताचा १६ वर्षांचा बुद्धिबळपटू आणि युवा ग्रँडमास्टर आर प्रग्यानंद याने मोठी कामगिरी करून दाखवली.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: भारतीय ग्रँडमास्टरने जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या ‘वर्ल्ड चॅम्पियन’ बुद्धिबळ मास्टर मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आहे. प्रग्नानंदने केवळ ३९ चालींमध्ये कार्लसनला हरवले. एअरथिंग्ज मास्टर्स (Airthings Masters chess) या ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत त्याने ही कामगिरी करून दाखवत साऱ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. सोमवारी सकाळी खेळण्यात आलेल्या सामन्यात प्रग्यानंदने कार्लसनला ३९ चालींमध्ये पराभूत करत काळ्या मोहऱ्यांसह खेळ जिंकला. कार्लसनने यापूर्वी सलग तीन सामने जिंकले होते, पण प्रग्यानंदने त्याच्या अश्वमेध रोखला.Airthings Masters Chess Tournament: Proud! India’s 16-year-old Grandmaster R Pragyanand – 39 moves – defeat of ‘World Champion’ Magnus Carlson

विजयानंतर प्रग्यानंद १२व्या क्रमांकावर पोहोचला

या विजयानंतर भारतीय ग्रँडमास्टर प्रग्यानंदचे ८ गुण झाले आणि तो आठव्या फेरीनंतर संयुक्त १२व्या स्थानावर पोहोचला. आधीच्या फेऱ्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे दमदार कामगिरी करणाऱ्या कार्लसनवर प्रग्यानंदचा विजय अनपेक्षित होता. या आधी प्रग्यानंदने फक्त लेव्ह अरोनियन विरुद्ध विजय नोंदवला होता. तर २०१४ मध्ये प्रग्यानंदला पराभवाचा सामना करावा लागला होता.

प्रग्यानंदने दोन सामने अनिर्णित राखले. त्याने अनिश गिरी आणि क्वांग लिम यांच्याविरुद्धचे सामने अनिर्णित राखण्यात यश मिळवलं होतं. तर एरिक हॅन्सन, डिंग लिरेन, जॅन क्रिझिस्टॉफ डुडा आणि शाख्रियार मामेदयारोव्ह यांच्याविरोधात त्याला पराभव पत्करावा लागला होता.

 

Airthings Masters Chess Tournament: Proud! India’s 16-year-old Grandmaster R Pragyanand – 39 moves – defeat of ‘World Champion’ Magnus Carlson

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात