विशेष प्रतिनिधी
पॅरीस : फ्रॉन्समध्ये आता महिलांना मोफत गर्भनिरोधक साधने देण्यात येणार आहेत. १ जानेवारीपासून २५ वर्षांपर्यंतच्या महिलांसाठी गर्भनिरोधक साधने मोफत दिली जाणार आहे. यासाठी २१ दशलक्ष युरो खर्च येणार असल्याचे आरोग्य मंत्री ऑलिव्हियर वेरान यांनी गुरुवारी सांगितले.Afghan pop star Arya has accused the Taliban of being Pakistan’s puppet
फ्रॉन्समध्ये सध्या निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे सरकार 2022 च्या निवडणूक प्रचाराची तयारी करत आहेत. त्याच वेळी ही घोषणा झाली आहे. याबाबत वेरान म्हणाले, काही तरुण स्त्रियांना गर्भनिरोधक साधने वापरणे शक्य नाही. त्यामुळे तरुण स्त्रियांमध्ये गर्भनिरोधक वापरात घट झाली आहे.
याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांना ही साधने परवडत नाही. एखादी तरुण स्त्री गर्भनिरोधक साधने केवळ महान आहेत म्हणून वापरू शकत नाही. स्वत:चे रक्षण करू शकत नाहीत, हे वेदनादायी आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. आत्तापर्यंत फ्रॉन्समध्ये १८ वर्षापर्यंतच्यांनाच मोफत गर्भनिरोधक साधने दिली जात होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App