विशेष प्रतिनिधी
कॅनबेरा : गलवान संघर्षात आपले सैनिक मारले गेले नाहीत असे म्हणाऱ्या चीनची ऑस्ट्रेलियाकडून पोलखोल करण्यात आली आहे. चीनचे ३८ सैनिक या संघर्षात मारले गेले किंवा नदीत वाहून गेले, असे ऑस्ट्रेलियन माध्यमांनी म्हटले आहे.According to the Australian media, 38 Chinese soldiers were killed in the Galwan conflict
पूर्व लडाख भागातील गलवान खोऱ्यात जून २०२० मध्ये भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये हिंसक झडप झााली होती. यात चीनच्या ३८ सैनिकांचा मृत्यू झाला. मात्र, केवळ चार चिनी सैनिकांचा मृत्यू झाल्याचे चीनने म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाचं वृत्तपत्र ‘द क्लॅक्सन’ने म्हटले आहे की, चीनकडून मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांच्या संख्येहून ९ पटींनी अधिक सैनिकांचा मृत्यू भारतीय सैनिकांसोबत झालेल्या हिंसक संघर्षात झाला होता. दीड वर्षांच्या संशोधनानंतर हा रिपोर्ट तयार करण्यात आलाय.
ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रानं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र सोशल मीडिया संशोधकांची टीम गठीत केली होती. या टीमकडून ‘गलवान डीकोडेड’ नावानं आपला अहवाल प्रसिद्ध केला. अँथनी क्लान यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या या विशेष अहवालामुळे चीनचा दावा खोटा ठरला आहे.चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे अनेक सैनिक त्या रात्री गलवान नदीत वाहून गेले’ असा उल्लेख यात करण्यात आला आहे.
चीनकडून तथ्यांत बदल करून अनेक खोटे दावे करण्यात आले. यासाठी दोन वेगवेगळ्या घटनांना एकत्र करून प्रोपोगंडा फैलावण्यात आला. चीननं कधीही गलवान खोऱ्यात ठार झालेल्या सैनिकांची संख्या अधिकृतरित्या जाहीर केली नाही परंतु, गेल्या वर्षी या हिंसक झडपेत ठार झालेल्या चार सैनिकांना पुरस्कार देण्याची घोषणा केली होती.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, १५-१६ जून २०२० च्या रात्री झिरो अंशाच्याही खाली गेलेल्या तापमानात वाहून गेल्यानं अनेक चिनी सैनिकांचा मृत्यू झाला होता. चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘वीबो’च्या अनेक वापरकर्त्यांच्या ब्लॉगच्या आधारे ‘त्या रात्री ३८ चिनी सैनिक नदीत वाहून गेल्याचा दावा’ ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रानं केला आहे.
मात्र, चिनी अधिकाऱ्यांकडून या सर्व सोशल मीडिया पोस्ट हटवण्यात आल्या होत्या. मृत्युमुखी पडलेल्या ३८ जणांत चीनकडून पदक जाहीर करण्यात आलेल्या ज्युनियर सार्जंट वांग झुओरान यांचाही समावेश होता.
मे २०२० च्या सुरुवातीला तिबेटमधील पँगॉन्ग सरोवराजवळ भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये चकमक झाली. चिनी सरकारी माध्यमं चकमकी आणि त्यानंतरच्या घटना कव्हर करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्या. त्यांनी बरीच तथ्यं लपवून ठेवली. त्यानंतर जगासमोर जे दावे करण्यात आले त्यातील बहुतेक गोष्टी कल्पोकल्पित होत्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App