Train Accident In Taiwan : तैवानमध्ये एक मोठी रेल्वे दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली आहे. परिवहन मंत्रालयाने म्हटले की, पूर्व तैवानमध्ये शुक्रवारी एक रेल्वे रूळावरून उतरल्याने कमीत कमी 36 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 72 जण जखमी झाले आहेत. यापूर्वी अग्निशमन विभागाने माहिती देताना मृत्यू व जखमींची संख्या कमी सांगितली होती. A terrible train accident in Taiwan, 36 killed on the spot, 72 injured; Fear of rising death toll
वृत्तसंस्था
ताइपे : तैवानमध्ये एक मोठी रेल्वे दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली आहे. परिवहन मंत्रालयाने म्हटले की, पूर्व तैवानमध्ये शुक्रवारी एक रेल्वे रूळावरून उतरल्याने कमीत कमी 36 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 72 जण जखमी झाले आहेत. यापूर्वी अग्निशमन विभागाने माहिती देताना मृत्यू व जखमींची संख्या कमी सांगितली होती.
#BREAKING 36 suspected dead in Taiwan train derailment: railway police pic.twitter.com/ldtelZSvPk — AFP News Agency (@AFP) April 2, 2021
#BREAKING 36 suspected dead in Taiwan train derailment: railway police pic.twitter.com/ldtelZSvPk
— AFP News Agency (@AFP) April 2, 2021
अग्निशमन विभागाने एका निवेदनात म्हटले होते की, ताइतुंग येथे जात असलेली रेल्वे हुइलियनच्या उत्तरेत एका बोगद्यात रूळावरून उतरली. तेथे भिंतीला धडकून अपघात घडला. अग्निशमन विभागाने तेव्हा मृतांची संख्या चार सांगितली होती, परंतु मृतांच्या व जखमींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. रेल्वे अपघातानंतर जखमींना वेळेवर रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
एका माहितीनुसार, रेल्वेत तब्बल 350 प्रवासी स्वार होते. सध्या बचावाचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
A terrible train accident in Taiwan, 36 killed on the spot, 72 injured; Fear of rising death toll
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App