इराकच्या संसदेत घुसला आंदोलकांचा मोठा जमाव, इराणसमर्थक सरकारला विरोध

वृत्तसंस्था

बगदाद : श्रीलंकेतील जनक्षोभासारखी परिस्थिती इराकमध्येही दिसू लागली आहे. शिया धर्मगुरू मुक्तादा अल-सद्र यांचे समर्थक सुरक्षा व्यवस्थेला न जुमानता बगदादमधील सर्वात सुरक्षित ग्रीन झोनची भिंत पार करून संसदेच्या वास्तूमध्ये घुसले. या जमावाने संसदेची इमारत ताब्यात घेतली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकीच्या सुमारे 290 दिवसांपासून देश काळजीवाहू पंतप्रधानांच्या भरवशावर वाटचाल करत आहे. A large crowd of protesters entered the parliament of Iraq, opposing the pro-Iranian government

गेल्या वर्षीच्या निवडणुकीत अल-सद्र गटाने सर्वाधिक जागा जिंकल्या. परंतु इतर पक्षांसोबतची चर्चा स्थगित झाली होती. कारण कुर्द व शिया खासदारांत वाटाघाटीबाबत सहमती होऊ शकली नव्हती. अल-सद्र व त्यांचे समर्थक शिया आहेत.


इराकमधील अमेरिकेच्या दूतावसाच्या दिशेने १२ क्षेपणास्त्रे आली डागण्यात; जीवितहानी नाही


मात्र इराणसोबत सलोखा ठेवण्याची भूमिका मांडणाऱ्या इतर गटांसोबत त्यांची सहमती नाही. मोहंमद अल सुदानी यांच्या फ्रेमवर्क पार्टीला त्यांचा विरोध आहे. नवीन राष्ट्रपती निवडणूक घेण्यासाठी पुरेसे समर्थन करण्यात अल-सद्र यांना अपयश आले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या खासदारांना सामूहिक रूपाने राजीनामे देण्याचे आदेश दिले होते.

2016 मध्येही अल-सद्रच्या समर्थकांनी तत्कालीन पंतप्रधान हैदर अल-सब्दी यांच्याकडे राजकीय सुधारणेसाठी संसदेवर हल्ला केला होता.

A large crowd of protesters entered the parliament of Iraq, opposing the pro-Iranian government

महत्वाच्या बातम्या