कोरोनामुळे जगभरात १५ लाख बालकांनी पालकांना गमावले, भारतातही अनाथ होण्याचे प्रमाण मोठे

विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन – कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे जगभरातील २१ देशांमधील सुमारे १५ लाख बालकांच्या आई किंवा वडिलांचे, किंवा दोघांचेही निधन झाले आहे, असे ‘द लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिका, अमेरिका, पेरू, भारत, ब्राझील आणि मेक्सिको या देशांमध्ये बालके अनाथ होण्याचे प्रमाण अधिक आहे. 15 lack boys became orphans

या १५ लाख जणांपैकी १ लाख १९ हजार बालके भारतातील आहेत. यापैकी २५ हजार ५०० बालकांनी कोरोना साथीत आईला गमावले आहे, तर ९० हजारांहून अधिक बालकांनी वडिलांना गमावल्याचे अहवालात म्हटले आहे.
कोरोनाने लोकांना अनेक चित्रविचित्र प्रसंग अनुभवायला भाग पाडले आहे.

अनाथ मुलांची संख्या हे याचेच वेगळे उदाहरण आहे. या मुलांचे भविष्यच कोरोनाने कठीण केले आहे. त्यांच्या मदतीसाठी त्या त्या ठिकाणी स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. मात्र प्रत्येक अनाथ मुलाच्या वाट्याला ही मदत पोहोचलेली नाही.

15 lack boys became orphans

महत्त्वाच्या बातम्या