पाकिस्तानमध्ये होळी साजरी करणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यात १५ जण जखमी

Holi new

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकावरील हल्ले दिवसेंदिवस वाढतच आहेत.

प्रतिनिधी

पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. दिवसेंदिवस त्यांच्यावरील अत्याचाराच्या बातम्या समोर येत आहेत. आता होळी साजरी करणाऱ्या हिंदूंवर हल्ला झाल्याची घटना समोर आळी आहे. असे सांगितले जात आहे की विद्यापीठातील मुस्लीम विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हिंदू विद्यार्थ्यांना होळी खेळण्यास मनाई केली, त्यानंतर त्यांच्यावर हल्ला केला, ज्यामध्ये १५ विद्यार्थी जखमी झाले. 15 injured in attack on Hindu students celebrating Holi in Pakistan

एका वृत्तसंस्थेनुसार, ही घटना लोहोरमधील पंजाब विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये घडली, जिथे सोमवारी सुमारे ३० हिंदू विद्यार्थी होळी साजरी करण्यासाठी कॉलेजच्या लॉनमध्ये जमले होते. त्यानंतर इस्लामिक जमियत तुलबा (IJT) च्या कार्यकर्त्यांनी त्यांना होळी साजरी करण्यापासून रोखले आणि विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला. या घटनेत १५ हिंदू विद्यार्थी जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांनी होळी साजरी करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून परवानगी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतरही कट्टर इस्लामिक विद्यार्थी संघटनेच्या लोकांनी त्याला नकार दिला.


Land for Jobs Scam : लालू प्रसाद यादव यांची सीबीआयकडून चौकशी सुरू; मीसा भारतींच्या घरी पोलीस दाखल!


 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेत जखमी झालेल्या एका विद्यार्थ्याने सांगितले आहे की आयजेटी सदस्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करत असताना विद्यापीठाच्या रक्षकांनीही त्यांना मारहाण केली होती. विद्यार्थ्याने सांगितले की IJT आणि सुरक्षा रक्षकांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे, परंतु अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.

आयजीटी प्रवक्ता इब्राहिम शाहिदच म्हणणे आहे की, हिंदू विद्यार्थ्यांसोबत झालेल्या वादात सहभागी असलेल्यांपैकी कोणीही आयजीटीशी संबंधित नाही. तर पंजाब विद्यापिठाचे प्रवक्ता खुर्रम शहजाद यांचे म्हणणे आहे की, विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना विद्यापीठातील लॉनवर होळी साजरी करण्यास परवानगी दिली नव्हती. तूर्तास कुलगुरूंनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

15 injured in attack on Hindu students celebrating Holi in Pakistan

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात