विशेष प्रतिनिधी
तुतिकोरीन – अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस हाच उतारा आहे, असे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.त्या म्हणाल्या की लशीमुळे उद्योगपती नियमित व्यवसाय करू शकत आहेत. व्यापाऱ्यांना माल मिळतो आहे.Vaccination is important for economy
शेतकरी शेतीची कामे पार पाडत आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते आहे. देशात आतापर्यंत ७३ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. देशातील लसीकरण मोहीम सुरळीतपणे सुरु आहे.
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अर्थ मंत्रालयाने सुरु केलेल्या योजनांचा त्यांनी उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, आपली सारी प्रार्थना तिसरी लाट येऊ नये म्हणूनच आहे, पण ती आली तर रुग्णालये आहेत का याचा विचार करावा लागेल.
रुग्णालये असतील तर तेथे अतिदक्षता विभाग आहे का, तो असल्यास ऑक्सिजन आहे का हे प्रश्न असतात. दुसऱ्या लाटेचा मोठा परिणाम होत असताना अशा साऱ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आमच्या मंत्रालयाने सुरु केलेल्या योजनांमुळे रुग्णालये सुसज्ज होत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णालयांनाही विस्तारीकरण करणे शक्य झाले.
महत्त्वाच्या बातम्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App