विशेष प्रतिनिधी
काबूल – अफगाणिस्तानात बंदुकीच्या बळावर सत्ता बळकावलेल्या तालिबान्यांनी सरकार स्थापून देशाचा कारभार चालविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. पूर्वी अमेरिकी तुरुंगात डांबण्यात आलेला दहशतवादी संरक्षण मंत्री झाला आहे, तर ज्याच्यावर आंतरराष्ट्रीय निर्बंध लादण्यात आले आहेत त्याला अर्थ मंत्री बनविण्यात आले. तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दूल घनी बरादर अफगाणिस्तानचा नवा अध्यक्ष होण्याची शक्यता आहे.Zakhir became defence minister of Afghan
संरक्षण मंत्रिपद मुल्ला अब्दुल कय्यूम झाकिर याच्याकडे सोपविण्यात आले. क्युबामधील ग्वांटानॅमो उपसागरातील अमेरिकी तुरुंगात त्याला डांबण्यात आले होते.अर्थ मंत्री म्हणून गुल आगा याला नेमण्यात आले. तालिबानचा अर्थविषयक प्रमुख असल्याबद्दल त्याच्यावर यापूर्वीच आंतरराष्ट्रीय निर्बंध लादण्यात आले आहेत.
सद्र इब्राहिम याला हंगामी गृह मंत्री म्हणून नेमण्यात आले आहे. झबीहुल्लाह मुजाहीद हा प्रवक्ता तालिबान्यांचा प्रमुख चेहरा आहे. पलायन केलेले अध्यक्ष अश्रफ घनी यांच्या सरकारमधील प्रवक्ता मारला गेल्यानंतर त्याने हे पद स्वीकारले आहे.
अध्यक्षीय प्रासाद आणि संसदेसह सर्व सरकारी कार्यालयांवर तालिबानने नियंत्रण मिळविले आहे. त्यानंतर निष्ठावान, वरिष्ठ आणि अनुभवी साथीदारांची मंत्री म्हणून निवड केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App