विशेष प्रतिनिधी
काबूल – अफगाणिस्तानमधील नव्या तालिबानी सत्ताधीशांनी शहरातील अनेक महिला कर्मचाऱ्यांना घरी थांबण्याचा आदेश दिला असल्याचे काबूलचे हंगामी महापौर हमदुल्ला नामोनी यांनी सांगितले. तालिबानने मुलींना शिक्षणासाठी याआधीच बंदी घातलेली आहे.Women cant work in Kabul now
आता त्यात या नव्या आदेशाची भर पडली आहे.ज्या कामासाठी पुरुषांचा पर्याय देणे शक्य नाही, अशाच ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांना काम देण्यास परवानगी आहे. यामध्ये डिझाइन आणि अभियांत्रिकी विभाग तसेच महिलांसाठीच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांमधील महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
काबूल महानगरपालिकेतील विभागांमध्ये काम करण्याऱ्या महिलांसंबंधी अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याने याकाळात त्यांना वेतन मिळू शकेल, असेही नामोनी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App