WikiLeaks Founder Julian Assange : ब्रिटीश सरकारने विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांना तुरुंगात त्यांची वाग्दत्त वधू स्टेला मॉरिसशी लग्न करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे असांज आता बेलमार्श तुरुंगात लग्न करू शकणार आहे. असांज आणि मॉरिस यांची 2015 मध्ये एंगेजमेंट झाली होती. त्यांना दोन मुले आहेत. विकिलिक्सच्या संस्थापकाने इक्वेडोरमध्ये आश्रय घेतल्यावर दोघांचा जन्म झाला. WikiLeaks Founder Julian Assange To Marry Fiancee In Jail British Government Approved
वृत्तसंस्था
लंडन : ब्रिटीश सरकारने विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांना तुरुंगात त्यांची वाग्दत्त वधू स्टेला मॉरिसशी लग्न करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे असांज आता बेलमार्श तुरुंगात लग्न करू शकणार आहे. असांज आणि मॉरिस यांची 2015 मध्ये एंगेजमेंट झाली होती. त्यांना दोन मुले आहेत. विकिलिक्सच्या संस्थापकाने इक्वेडोरमध्ये आश्रय घेतल्यावर दोघांचा जन्म झाला.
ब्रिटनच्या तुरुंग सेवेने असांजचा अर्ज स्वीकारला असून त्याच्या मागणीचा जेलरनेही सामान्य कैद्यांप्रमाणे विचार केला आहे. मान्यता मिळाल्यानंतर स्टेला मॉरिस म्हणाल्या की, त्यांना आशा आहे की त्यांच्या लग्नात आणखी कोणताही अडथळा येणार नाही.
यूके कायद्यानुसार, कैद्यांना 1983च्या विवाह कायद्यानुसार तुरुंगात लग्न करण्याची परवानगी आहे. मात्र, त्याचा संपूर्ण खर्च लग्न करणाऱ्या लोकांनाच करावा लागतो आणि यात जनतेला पैसा अजिबात वापरला जात नाही.
स्टेला मॉरिस आणि ज्युलियन असांज यांची 2011 मध्ये भेट झाली होती, जेव्हा स्टेला असांजच्या लीगल टीम सामील झाली होती. मॉरिस म्हणतात की, असांज जेव्हा लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासात होता, तेव्हा ती त्याला दररोज भेटत असे आणि असांजने स्वतः व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याच्या दोन मुलांचा जन्म पाहिला होता.
WikiLeaks Founder Julian Assange To Marry Fiancee In Jail British Government Approved
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App