वृत्तसंस्था
कोलोरॅडो : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन गुरुवारी कोलोरॅडो येथील एअर फोर्स अकादमीच्या कार्यक्रमात स्टेजवरच कोसळले. पदवीदान समारंभात सहभागी होण्यासाठी ते येथे आले होते. भाषण दिल्यानंतर त्यांनी एका कॅडेटशी हस्तांदोलन केले आणि ते आपल्या सीटच्या दिशेने चालू लागले तेव्हा अडखळून स्टेजवर कोसळले.WATCH US President Joe Biden Falls on stage, leg stuck in sandbag, White House reveals – no injury
वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना उचलले. त्यांना उठण्यास थोडा त्रास होत होता, तथापि त्यांना उभे राहिल्यानंतर मदतीची आवश्यकता नव्हती. व्हाइट हाऊसचे कम्युनिकेशन डायरेक्टर बेन लाबोल्ट यांनी ट्विट केले की, राष्ट्राध्यक्ष ठीक आहेत आणि त्यांना दुखापत झालेली नाही.
https://twitter.com/jacobkschneider/status/1664343681321541636?s=20
स्टेजवर पडलेल्या पिशवीत बायडेन यांचा पाय अडकला
या कार्यक्रमाच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बायडेन उभे राहताच त्यांनी बोटाने स्टेजकडे इशारा केला. ती काळ्या रंगाची पिशवी होती, जी वाळूने भरलेली होती. यामध्ये बायडेन यांचा पाय अडकला होता.
बायडेन हे अमेरिकेचे सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष
बायडेन हे अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपद भूषवणारे सर्वात वयस्कर नेते आहेत. 80 वर्षीय या डेमोक्रॅट नेत्याने 20 जानेवारी 2021 रोजी राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून त्यांनी अमेरिकेची सत्ता मिळवली होती. 2024 मध्ये ते पुन्हा निवडणूक लढवणार आहेत.
एक दिवस आधी, त्यांच्या डॉक्टरांनी एक अहवाल जारी केला होता की, बायडेन शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत आणि ते दररोज व्यायाम करतात. तथापि, ते अनेकदा अडखळतात. नोव्हेंबर 2020 मध्ये बायडेन यांना उजव्या पायात हेअरलाइन फ्रॅक्चर झाला. त्यावेळी ते आपल्या कुत्र्यासोबत खेळत होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App