वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन डेलावेअर राज्यात सायकल चालवत असताना पडले. मात्र, या अपघातात त्यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते सुखरूप आहेत. अपघातानंतर ते म्हणाले, ‘मी ठीक आहे’.WATCH US President Joe Biden falls off a bicycle, gets stuck in a pedal, mocks Trump’s son
शनिवारी (18 जून) जो बायडेन त्यांच्या पत्नी जिल बायडेनसोबत डेलावेर राज्यातील रेहोबोथ बीचवर आठवड्याच्या शेवटी सहलीसाठी आले होते. येथे त्यांनी सायकल चालवण्याचा आनंद लुटला. त्यांना पाहण्यासाठी त्यांचे अनेक समर्थक रेहोबोथ बीच येथील केप हेन्लोपेन स्टेट पार्कमध्ये पोहोचले.
Here’s footage I took of President @JoeBiden falling over on his bike this morning in Rehoboth. pic.twitter.com/hCt1af0pFU — Nikki Schwab (@NikkiSchwab) June 18, 2022
Here’s footage I took of President @JoeBiden falling over on his bike this morning in Rehoboth. pic.twitter.com/hCt1af0pFU
— Nikki Schwab (@NikkiSchwab) June 18, 2022
सायकल चालवताना जो बायडेन थांबताच त्यांचा पाय पेडलमध्ये अडकला आणि ते अडखळून पडले. बायडेन यांनी सायकल चालवताना टी-शर्ट, शॉट्स आणि हेल्मेट घातले होते.
खाली पडताच सुरक्षा रक्षकांचा घेराव
जो बायडेन सायकलवरून पडताच त्यांच्या रक्षकांनी घेरले आणि त्यांना उठण्यास मदत केली. या घटनेनंतर जेव्हा बायडेन यांना विचारण्यात आले की, ते कसे पडले, तेव्हा त्यांनी सायकलच्या पॅडलवर पाय ठेवला आणि म्हणाले, ‘माझा पाय अडकला होता.’
ट्रम्प यांच्या मुलाने मारला टोमणा
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत टोमणा मारला आहे. किती दिवस अजूनही पुतीन यांनाच जबाबदार धरणार? असा सवाल त्यांनी केला आहे.
How long till they blame Putin? https://t.co/IWSbr28vAI — Donald Trump Jr. (@DonaldJTrumpJr) June 18, 2022
How long till they blame Putin? https://t.co/IWSbr28vAI
— Donald Trump Jr. (@DonaldJTrumpJr) June 18, 2022
व्हाइट हाऊसची माहिती- राष्ट्राध्यक्ष ठीक आहेत
बायडेन यांनी त्यांचे समर्थक आणि प्रसारमाध्यमांशी बराच वेळ संवाद साधला. व्हाइट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सायकलवरून उतरताना त्यांचा पाय पॅडलवर अडकला तेव्हा ते थांबले. सध्या ते ठीक आहेत. उर्वरित दिवस त्यांनी कुटुंबासोबत घालवले.
अमेरिका चीनवरील शुल्क कमी करणार
प्रसारमाध्यमांशी बोलताना अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी चीनचाही उल्लेख केला. चीनवरील अमेरिकेचे शुल्क कमी करण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच ते चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App