या घटनेनंतर हिंदू समाजातील लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बांगलादेशातील दुर्गामाता मंदिरात तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. ब्राह्मणबारिया जिल्ह्यात मंदिराची तोडफोड केली गेली आहे. या घटनेनंतर हिंदू समाजातील लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. Vandalism of Durgamata temple in Bangladesh The accused was arrested but the situation was tense
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ही संपूर्ण घटना नियामतपूर गावातील आहे जिथे दुर्गामाता मंदिराचे नुकसान झाले आहे. खलील मिया असे आरोपीचे नाव आहे, ज्याला अटक करण्यात आली आहे. वृत्तानुसार, तोडफोडीचे वृत्त पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आले.
ब्राह्मणबारियाचे पोलीस अधीक्षक मोहम्मद शखावत हुसेन यांनी खलील मियाच्या अटकेची पुष्टी केली, परंतु आरोपीने हे कृत्य का केले हे अद्याप पोलिसांनी उघड केलेले नाही. पोलीस अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार, त्याने असे निंदनीय कृत्य का केले, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. नियामतपूर सार्वजनिक दुर्गामाता मंदिराचे अध्यक्ष जगदीश दास यांच्या म्हणण्यानुसार, अचानक झालेल्या तोडफोडीमुळे स्थानिक हिंदू समुदायाच्या सदस्यांमध्ये संताप पसरला आहे. तपासात समोर आले आहे की, आरोपी खलील मिया हा नियामतपूर गावात आपल्या बहिणीच्या घरी भेटण्यासाठी आला होता तेव्हा त्याने हे कृत्य केलं. रिपोर्टनुसार, आरोपीने दुर्गामाता मंदिरातील पाच ते सहा मूर्ती फोडल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App