विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : प्रत्येक क्षेत्रात चीन अमेरिकेच्या तोडीचा स्पर्धक म्हणून पुढे येत असून त्यामुळे अमेरिकेच्या वर्चस्वाला धोका निर्माण झाला असल्याचे मत खुद्द अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या संचालिका एव्हरिल हेन्स यांनी सिनेट समितीपुढे मांडल्याने खळबळ उडाली आहे.USA shattered due to Chinas growing power
अमेरिकेचा वाद चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाबरोबर असून त्या देशातील सामान्य नागरिकांबरोबर नाही, असे हेन्स यांनी स्पष्ट केले. चीनबरोबरच रशिया, इराण आणि उत्तर कोरियापासूनही अमेरिकेला धोका असल्याचे हेन्स यांनी सांगितले
चीनमध्ये पुरेशी सायबर क्षमता असून त्यांना त्याचा अल्प प्रमाणात वापर करायचे ठरविल्यास अमेरिकेतील स्थानिक पातळीवरील काही यंत्रणांमध्ये ते हस्तक्षेप करू शकतात. चीनच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक जागतिक नियमांमध्ये त्यांच्या यंत्रणेला सोयीचे ठरतील
असे बदल होण्यासाठी दबाव वाढत आहे. सिनेट समितीसमोर बोलताना हेन्स म्हणाल्या की, चीनची क्षमता वाढत असल्याने अमेरिकेला मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. जागतिक नियमांमध्ये त्यांच्या यंत्रणेला अनुकूल असा बदल करण्यासाठीचा दबाव चीनकडून वाढतो आहे.
आपल्या वाढत्या सामर्थ्याचे प्रदर्शन करण्यासाठी चीन सर्वसमावेशक दृष्टीकोन अवलंबत असून शेजारी देशांना चीनच्याच प्राधान्यक्रमानुसार व्यवहार करावे लागत आहेत.
इतर बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App