वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : ऑड्रे हेल नावाच्या 28 वर्षीय महिलेने अमेरिकेतील टेनेसी राज्यातील नॅशविले येथील शाळेत गोळीबार केला. गोळी लागल्याने 6 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये तीन विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. गोळी लागल्याने हे सर्व गंभीर जखमी झाले होते. त्यांना मोनरो कॅरेल ज्युनियर चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.US school shooting, 6 dead including 3 students, former student attacker killed in police firing
हल्ल्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि 15 मिनिटांतच हल्लेखोर महिलेला ठार केले. रिपोर्ट्सनुसार, हा हल्ला द कॉवेनंट नावाच्या ख्रिश्चन शाळेवर झाला. घटनेनंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नॅशविले पोलिसांचे प्रवक्ते डॉन आरोन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आरोपी महिलेकडे दोन रायफल आणि एक हँडगन होती. ती ट्रान्सजेंडर होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर ट्रान्सजेंडर
ऑड्रे हेल ट्रान्सजेंडर असल्याचे पोलिसांनी सांगितले. ती स्त्री जन्माला आली, पण तिच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ती स्वत:ला पुरुष म्हणून ओळखते आणि पुरुष म्हणून जगत होती. मात्र, पोलिसांनी याबाबत फारशी माहिती दिलेली नाही. ती त्याच शाळेची माजी विद्यार्थिनी असल्याचंही सांगण्यात येत आहे.
पोलिसांना तिच्याकडे शाळेचे नकाशे सापडले आणि ती अनेक दिवसांपासून शाळेची रेकी करत असल्याचेही समजले. तिच्याजवळ सापडलेल्या काही कागदपत्रांमध्ये दुसऱ्या ठिकाणांचाही उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र तिथली सुरक्षा अधिक असल्याने हल्लेखोराने तिथे हल्ला न करण्याचा निर्णय घेतला.
शाळेबद्दल नाराजीमुळेच गोळीबार
ऑड्रे हेलने याच शाळेतून शिक्षण घेतल्याचे समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्याकडून दोन कागदपत्रे जप्त करण्यात आली असून त्यानुसार तिला जबरदस्तीने या ख्रिश्चन शाळेत शिकण्यासाठी पाठवण्यात आले होते. याचा बदला म्हणून रागातून तिने शाळेत गोळीबार केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App