WATCH : भारताच्या समर्थनार्थ भारतीय-अमेरिकींनी काढली रॅली, एकजुटीतून दिले खलिस्तान्यांना प्रत्युत्तर


वृत्तसंस्था

सॅन फ्रान्सिस्को : सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासासमोर मोठ्या संख्येने भारतीय-अमेरिकन समुदायाच्या सदस्यांनी शांतता रॅली काढली. या आठवड्याच्या सुरुवातीला फुटीरतावाद्यांनी वाणिज्य दूतावासाबाहेर तोडफोड केली होती. खलिस्तान समर्थक निदर्शकांच्या गटाने गेल्या रविवारी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला करून नुकसान केले.WATCH Indian-Americans rally in support of India, unitedly respond to Khalistan

खलिस्तान समर्थक घोषणा देत आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले तात्पुरते सुरक्षा अडथळे तोडले होते आणि वाणिज्य दूतावासाच्या आवारात दोन तथाकथित खलिस्तानी झेंडे लावले होते. मात्र, हे झेंडे लवकरच वाणिज्य दूतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांनी हटवले. या घटनेच्या निषेधार्थ भारतासोबत एकजूट दर्शविण्यासाठी शुक्रवारी सॅन फ्रान्सिस्को आणि आसपास मोठ्या संख्येने भारतीय-अमेरिकन लोकांनी तिरंगा ध्वज फडकावला.



तिरंग्यासह अमेरिकेचा ध्वज फडकावला

यावेळी एकत्र जमून त्यांनी फुटीरतावादी शिखांच्या विध्वंसक कारवायांचा निषेध केला. तेव्हा काही फुटीरतावादी शीखही तेथे उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलीस मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित होते. काही फुटीरतावादी शिखांनी खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या, परंतु मोठ्या संख्येने भारतीय अमेरिकन लोकांनी ‘वंदे मातरम्’चा नारा दिला आणि अमेरिकेसह भारताचा राष्ट्रध्वज फडकावला. भारतीय-अमेरिकन भारताच्या बाजूने घोषणा देत होते. अलिकडच्या काही महिन्यांत कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि यूकेमध्ये खलिस्तान समर्थकांकडून भारतविरोधी कारवायांमध्ये वाढ झाली आहे, ज्यांनी या देशांमध्ये काही हिंदू मंदिरांची तोडफोड केली आहे.

खलिस्तानी हल्ल्याचा भारताने अमेरिकेकडे निषेध नोंदवला

सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाबाहेर खलिस्तानी समर्थकांनी केलेल्या तोडफोडीबद्दल भारताने सोमवारी दिल्लीतील अमेरिकेच्या राजदूताकडे तीव्र निषेध नोंदवला. नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अमेरिकन सरकारने योग्य उपाययोजना कराव्यात. अमेरिकेत भारतीय वंशाचे सुमारे 42 लाख लोक राहतात. भारतीय वंशाचे लोक 31.8 लाख लोकसंख्येसह अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा आशियाई वांशिक गट आहे.

WATCH Indian-Americans rally in support of India, unitedly respond to Khalistan

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात