उड्डाण दरम्यान इमारतीला धडकल्याने विमान कोसळले. US Plane Crash
विशेष प्रतिनिधी
कॅलिफोर्निया : दक्षिण कोरियानंतर आता अमेरिकेत मोठा विमान अपघात झाला आहे. हा विमान अपघात दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर विमान टेक ऑफ करताना इमारतीच्या छताला धडकले. त्यानंतर विमानात मोठा स्फोट होऊन त्यात आग लागली. या विमान अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. US Plane Crash
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा अपघात गुरुवारी म्हणजेच 2 जानेवारी रोजी झाला. जेव्हा एक सिंगल-इंजिन विमान दुपारच्या वेळी दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये एका व्यावसायिक इमारतीवर कोसळले. या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
फुलरटन पोलिस विभागाच्या प्रवक्त्या क्रिस्टी वेल्स यांनी सांगितले की, काही लोकांना किरकोळ दुखापत झाली असून काहींना गंभीर दुखापत झाली आहे. यूएस फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशननुसार, गुरुवारी अपघात झालेल्या विमानाची ओळख सिंगल-इंजिन व्हॅन RV-10 अशी करण्यात आली आहे. ऑरेंज काउंटीचे प्रतिनिधीत्व करणारे यूएस प्रतिनिधी लू कोरिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की विमान एका फर्निचर उत्पादन इमारतीवर कोसळले. डिस्नेलँडपासून 6 मैल अंतरावर असलेल्या फुलरटन म्युनिसिपल विमानतळाजवळ हा विमान अपघात झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App