प्रतिनिधी
न्यूयॉर्क – अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात जंगलांमध्ये लागलेल्या वणव्यांमध्ये प्रचंड मोठी वृक्षसंपदा नष्ट झाली आहे. आगीच्या ज्वाळांमुळे जगातील सर्वांत मोठा वृक्ष असलेल्या ‘जनरल शेरमन’ या सेक्वाया प्रकारच्या वृक्षालाही धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्याला वाचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.US fireman trying to save world tallest tree
कॅलिफोर्नियामधील ‘सेक्वाया राष्ट्रीय उद्यान’ तेथील उत्तुंग वाढलेल्या सेक्वाया वृक्षांसाठी प्रसिद्ध आहे. हे वृक्ष शेकडो वर्ष जुने असून त्यांची संख्या दोन हजारांच्या आसपास आहे. यातच २७५ फूट उंच असलेला आणि २५०० वर्षे जुना असलेला वृक्षही आहे. त्याला ‘जनरल शेरमन’ असे नाव देण्यात आले आहे.
हा आकाराने जगातील सर्वांत मोठा वृक्ष आहे. कॅलिफोर्नियातील जंगलांना लागलेल्या वणव्यांच्या झळा या राष्ट्रीय उद्यानापर्यंतही पोहोचतील, अशी शक्यता गृहित धरूनच या वृक्षांना वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. या वृक्षांभोवती आगीला प्रतिबंध करणारे कागद गुंडाळले जात आहेत.
वणवे विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे ३५० जवान अहोरात्र मेहनत घेत आहेत. विमानातूनही पाण्याचा फवारा केला जात आहे. वीज पडल्याने नजीकच्या पॅराडाइज आणि कॉलनी या जंगलांमध्ये वणवे पेटले आहेत. या वर्षात कॅलिफोर्नियामध्ये ७४०० वणवे लागले. त्यात २२ लाख हेक्टरवरील वनसंपदा खाक झाली.
तापमान वाढीमुळे पर्यावरणात बदल होऊन या भागातील तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे उष्णतेच्या झळा निर्माण होत असून दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App