विशेष प्रतिनिधी
मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला फिलिपिन्समध्ये अटक करण्यात आली आहे. Underworld don suresh pujari arrested in Philipines
सुरेश पुजारी हा आधी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीसाठी काम करत होता. नंतर त्याने स्वतःची टोळी तयार केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून पोलिस त्याच्या मागावर होते.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक ; चरस तस्करीप्रकरणी कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार सुरेश पुजारीला १५ ऑक्टोबरला अटक करण्यात आली. आता त्याला फिलिपिन्समधून भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महत्त्वाच्या तपास यंत्रणा सुरेश पुजारीच्या मागावर होत्या. गेल्या महिन्यात २१ सप्टेंबर रोजी सुरेश पुजारी फिलिपिन्समध्ये असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. केंद्रीय तपास यंत्रणांनी याची माहिती इंटरपोलला दिल्यानंतर त्याच्या अटकेसाठी पावले उचलण्यात आली. अखेर त्याला फिलिपिन्सच्या परांकी शहरात एका इमारतीच्या बाहेर उभा असताना त्याला अटक करण्यात आली.
पुजारी हा मूळचा उल्हासनगरचा रहिवासी आहे. तो २००७मध्ये भारतातून बाहेर पळून गेला होता. रवी पुजारीशी मतभेद झाल्यानंतर त्याने २०१२मध्ये स्वतःची टोळी तयार केली होती. नवी मुंबई, ठाणे, मुंबई या भागातल्या डान्स बार चालकांना खंडणीसाठी सुरेश पुजारी टोळीचे फोन येत असत. तसेच, खंडणी न देणाऱ्यांचे खूनही या टोळीने केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App