राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्यासोबत द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा.
विशेष प्रतिनिधी
अबुधाबी : फ्रान्सचा दौरा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता यूएईला पोहोचले आहेत. येथे त्यांचे स्वागत अतिशय अनोख्या पद्धतीने करण्यात आले. पंतप्रधान मोदी UAE मधील अबुधाबी विमानतळावर उतरले, तेव्हा जेथे त्यांचे विमानतळावर क्राउन प्रिन्स एचएच शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी स्वागत केले. UAE has won the hearts of Indians Prime Minister Modis photo with the Tricolor is displayed on Burj Khalifa
एवढंच नाहीतर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी दुबईची जगातील सर्वात मोठी इमारती बुर्ज खलिफावर भारतीय तिरंगा ध्वजासह पंतप्रधान मोदींचे छायाचित्र झळकवण्यात आले. तसेच, विद्यूत रोषणाद्वारे “वेलकम ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी” असे लिहिले होते.
मोदी या UAE दौऱ्यावर राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्यासोबत प्रमुख द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींचा हा पाचवा यूएई दौरा आहे. ऑगस्ट 2015 मध्ये, त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचा पहिला दौरा केला होता, तेव्हा 34 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांनी UAE ला दिलेली पहिली भेट होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App