विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : सिनेटमध्ये सतत ८ तास ३२ मिनिटे बोलून ट्रम्प यांचे सहकारी आणि रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर केविन मॅकार्थी यांनी जागतिक विक्रम केला आहे. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या ‘बिल्ड बॅक बॅटर’ विधेयकावर अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ प्रतिनिधीगृहात मतदान होऊ शकले नाही.Trump’s Senetor world record for longest speech in Senate, blocking Biden’s bill for 8 hours 32 minutes
यापूर्वी 8 तास आणि 7 मिनिटांचे भाषण देऊन अमेरिकन सिनेटच्या वर्तमान सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी विक्रम केला होता. हा विक्रम केविन यांनी मोडला आहे. विक्रम मोडला. विशेष बाब म्हणजे सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांना या विधेयकावर मतदान व्हावे अशी इच्छा होती. परंतु केविन यांनी भाषणाची वेळ कमी करण्यास नकार दिला. त्यामुळे मतदान रखडले.
या विधेयकासाठी सुमारे 1850 अब्ज डॉलर्स आहे. त्याला रिपब्लिकन पक्षाचा विरोध आहे. त्यामुळे केविन यांनी प्रदीर्घ भाषण केले. केविन भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले, डेमोक्रॅट्सनी अनावश्यक खर्च करू नये अशी माझी इच्छा आहे. हे विधेयक मंजूर करण्यापूर्वी आम्ही त्यांना सावध करू इच्छितो. काही सूचना आहेत, त्या सरकारला मान्य कराव्या लागतील.
बिडेन यांचा डेमोक्रॅटिक पक्ष सत्तेत आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष विरोधात आहे. डेमोक्रॅटिक पक्षाची या विधेयकावर त्वरीत चर्चा व्हावी आणि मतदान व्हावे अशी इच्छा होती. परंतु केविन यांच्या प्रदीर्घ भाषणामुळे मतदान होऊ शकले नाही.
सत्ताधारी पक्षाचे नेते स्टेन हॉयर संसदेची कारवाई सुरू झाल्यावर म्हणाले, आम्ही लवकरच या विधेयकावर मतदान करू. त्याला विरोधकांनी विरोध केला. रात्री ८.३८ वाजता केविन बोलायला उभे राहिले. पहाटे ५ वाजून १० वाजेपर्यंत ते बोलत होते. भाषणानंतर केविन यांनी आपल्या सहकाºयांचे आभार मानले. मला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद, असे ते म्हणाले.
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, सुरुवातीला या बिलासाठी केवळ 20 मिनिटांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. पण, एकटे केविन आठ तासांहून अधिक काळ बोलले. त्यांनी डेमोक्रॅट्सवर जोरदार टीका केली. या विधेयकात सामाजिक सुधारणांचा समावेश होता. परंतु मॅककार्थी यांनी महागाई, गॅसच्या किमती, सीमा सुरक्षा आणि अफगाणिस्तानमधून सैन्य माघार यासारख्या मुद्द्यांवरही भाष्य केले. नंतर ते म्हणाले, मला माहित आहे की तुमच्यापैकी काही जण मला वेडा समजत असतील.
या भाषणापूर्वी केविन यांचे सर्वात मोठे भाषण फक्त 20 मिनिटे 17 सेकंद होते. एक डेमोक्रॅट खासदार म्हणाला, मिस्टर केविन, तुम्ही ठीक आहात का?भारतामध्ये लोकसभा किंवा राज्यसभेत अध्यक्ष एखादा खासदार जास्त वेळ बोलू लागला तर रोखतात हे आपण सर्वांनी पाहिले आहे. मग मॅकार्थी इतका वेळ कसे बोलू शकले असा प्रश्न कोणालाही पडले.
मात्र, अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये एक नियम आहे. याला ‘मॅजिक मिनिट’ म्हणतात. या अंतर्गत सभागृहातील सत्ताधारी पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते वाद संपेपर्यंत एकाच वेळी बोलू शकतात. त्यामुळे केविन यांना अध्यक्षांनाही रोखता आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App