
वृत्तसंस्था
टोकियो : टोकिया पॅराऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंनी अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूने दुसरे सुवर्ण पदक जिंकून मोठा पराक्रम गाजविला आहे. सुमित अँटील याने भालाफेकीत जागतिक विक्रमासह सुवर्ण पदक जिंकून भारताची मान जगात उंचवली आहे. (Sport Class F64) मध्ये त्याने तब्बल ६८.५५ मीटर अंतरावर भाला फेक करून सुवर्ण पदकावर भारताचे नाव कोरले आहे.TokyoParalympics, Men’s Javelin Throw: Sumit Antil wins gold (Sport Class F64) with World Record throw of 68.55m
भारताला ऑलिपिंकमध्ये दुसरे सुवर्ण पदक मिळताच देशात आनंदाची लहर पसरली असून आजच्या जन्माष्टमीच्या आनंदाला त्यामुळे बहर आला आहे. आज सकाळपासून भारताची पदकांची लयलूट सुरूच आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमित अँटील याचे अभिनंदन केले असून त्याने देशाची मान जगात उंचावल्याबद्दल समस्त भारतीयांना अभिमान वाटतो, असे म्हटले आहे.तत्पूर्वी, टोकियो पँराऑलिम्पिकमध्ये भारतीय दिव्यांग खेळाडूंनी अतिशय चमकदार कामगिरी करत पदकांची लयलूट चालू ठेवली.
#TokyoParalympics, Men's Javelin Throw: Sumit Antil wins gold (Sport Class F64) with World Record throw of 68.55m pic.twitter.com/fQqBgevgHZ
— ANI (@ANI) August 30, 2021
अवनी लेखरा हिने आज सकाळीच एअर पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक मिळवल्यानंतर भारताने आणखीन तीन पदकांची कमाई केली आहे. देवेंद्र झांझरिया याने भालाफेकीत रौप्यपदक मिळवले. त्याच प्रकारात सुंदर सिंग याने ब्रॉंझपदक पटकावले तर थाळीफेकीत योगेश कथूनिया याने रौप्य पदक पटकावले आहे.
"Our athletes continue to shine at the #Paralympics! The nation is proud of Sumit Antil’s record-breaking performance in the Paralympics," tweets PM Narendra Modi as he congratulates para javelin thrower Sumit Antil, for winning a #Gold medal at Tokyo Paralympics pic.twitter.com/Ub8A8jVtBe
— ANI (@ANI) August 30, 2021
TokyoParalympics, Men’s Javelin Throw: Sumit Antil wins gold (Sport Class F64) with World Record throw of 68.55m
महत्त्वाच्या बातम्या
- ED effect; खासदार भावना गवळींना दिसली “आणीबाणी”; संजय राऊतांना दिसले “दिल्लीत त्यांचे येणारे दिवस”
- संजय राऊत म्हणतात ईडी ची नोटीस म्हणजे प्रेमपत्र,भाजपचा माणूस हा ईडीमध्ये डेस्क ऑफिसर
- मारुती सुझुकीच्या कार सप्टेंबरपासून महागणार, वर्षातील सलग तिसरी वाढ; अनेक पार्टच्या किमती वाढल्याने घेतला निर्णय
- हरियाणात सक्तीने धर्मांतराच्या घटना समोर; धर्मांतरविरोधी कायदा आणणार; मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची घोषणा