विशेष प्रतिनिधी
काबुल : अफगाणिस्तानमधील एक अनाथ रेफ्युजी मुलगी जी नॅशनल जियोग्राफीचा फ्रंट कव्हर पेजवर झळकली होती. ती तुम्ही पाहिली असेलच. 1978 साली जेव्हा सोविएतने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. त्यावेळी बऱ्याच अफगाणी लोकांनी पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला होता. त्यापैकीच एक होती शरबत गुला.
The refugee girl who appeared on the front cover of National Geographic Magazine met the President of Afghanistan
अनाथ शरबत गुला त्यावेळी पाकिस्तानमधील छावण्यांमध्ये रेफ्यूजी म्हणून राहात होती. त्यावेळी अमेरिकन फोटोग्राफर स्टीव्ह मॅककरी यांनी तिचा हा फोटो घेतला होता. त्यानंतर हा फोटो नॅशनल जिऑग्राफि मॅगझीनच्या फ्रंट कव्हरवर झळकला होता. डोळ्यात दुःख, बगावत, आयुष्याला विचारलेले हजारो प्रश्न तिच्या चेहऱ्यावर झळकत होते. आणि या फोटोमुळे शरबत आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिध्द झाली होती. आता शरबत 45 वर्षांची आहे. नुकताच तिने अफगाणिस्तानचे प्रेसिडेंट अशरफ घनी यांची काबूल येथे भेट घेतली. आणि अश्या प्रकारे त्या मायदेशी परतल्या आहेत. त्यावेळी पुन्हा या आठवणींना उजाळा देण्यात आला.
Taliban On India: तालिबानी परराष्ट्र मंत्री म्हणाले- अफगाणिस्तानला भारतासह कोणत्याही देशाशी संघर्ष नको!, इस्लामिक स्टेटचा धोका
1980 साली ती प्रथम पाकिस्तानमधील छावणीमध्ये राहिली. तेथून Ngo च्या मदतीने तिला इटलीमध्ये आश्रय देण्यात आला. इटलीमध्ये ती नेमकी कुठे राहते याबाबत मात्र इटली इकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे नॅशनल जिओग्राफिकच्या फ्रंट कव्हरवर प्रसिध्द झालेली ती अनाथ मुलगी हिचे पुढे काय झाले. असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला होता.
ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवटीने ताबा मिळवला आहे. या वेळी जवळपास 5000 अफगाणिस्तानमधील लोकांना इटलीने आश्रय दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App