चीनकडून तिबेटकडे धावणारी पहिली इलेक्ट्रिक बुलेट ट्रेन सुरु; सीमावर्ती अरुणाचल प्रदेशाजवळून जाणार

वृत्तसंस्था

बीजिंग : चीनने हिमालयातील दुर्गम असलेल्या तिबेट भागात शुक्रवारी पहिली इलेक्ट्रिक बुलेट ट्रेन सुरु केली आहे. तिबेटची राजधानी ल्हासा ते निंगची या दरम्यान धावणारी ही बुलेट ट्रेन तिबेटच्या सीमावर्ती असलेल्या भारताच्या अरुणाचल प्रदेशाजवळून जात आहे. The first electric bullet train from China to Tibet is launched

चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षपूर्ती सोहळा १ जुलैपासून सुरु होत आहे. त्यापूर्वींच या बुलेट ट्रेनचे उदघाटन करण्यात आले.सिचुआन – तिबेट रेल्वे ल्हासा-निंगची या ४३५.५ किलोमीटर लांबीच्या मार्गावर सुरु झाली आहे. तिबेट मध्ये प्रथमच इलेक्ट्रिक बुलेट ट्रेन सुरु केल्याचे वृत्त शिन्यूहा न्यूज एजन्सीने दिले आहे.

सिचुआन-तिबेट रेल्वेतर्फे सुरु केलेल्या किनिंग-तिबेट रेल्वेनंतर तिबेटमधील ही दुसरी रेल्वे असेल. जगातील सर्वात भौगोलिकदृष्ट्या सक्रिय क्षेत्रांपैकी एक असलेल्या किंगहाई-तिबेट पठाराच्या दक्षिणपूर्व भागातून ती जाईल.

नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी सिबवान प्रांत आणि तिबेटमधील निंगची यांना जोडणार्‍या नवीन रेल्वे प्रकल्पाचे काम त्वरेने करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. नवीन रेल्वेमार्ग सीमावर्ती स्थिरतेसाठी संरक्षणासाठी महत्वाची भूमिका बजावेल, असे सांगितले.

सिचुआन-तिबेट रेल्वे सिचुआन प्रांताची राजधानी चेंगडू येथून प्रारंभ होते आणि यानमार्गे जाते. कंबो मार्गे तिबेटमध्ये प्रवेश करते. एरवी चेंगडू ते ल्हासा पर्यंतच्या प्रवासाला ४८ तास लागतात. पण रेल्वेमुळे हे अंतर १३ तासात कापले जाते.

निंगची हे अरुणचल प्रदेश सीमेला लागून असलेले मेडोगचे प्रीफेक्चर लेव्हल शहर आहे. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनने अनेकदा केला आहे. भारत-चीन सीमा विवादात ३४८८किमी लांबीची वास्तविक नियंत्रण रेखा (एलएसी) व्यापली आहे.

सिंघुआ युनिव्हर्सिटीच्या नॅशनल स्ट्रॅटेजी इन्स्टिट्यूटच्या रिसर्च डिपार्टमेंटचे संचालक कियान फेंग यांनी ग्लोबल टाईम्सला सांगितले की, “जर चीन-भारत सीमेवर संकट निर्माण झाले तर रेल्वेने आवश्यक साहित्य पोचविण्यास ही रेल्वे मोलाची कामगिरी बजाऊ शकते.

The first electric bullet train from China to Tibet is launched

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात