विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : टेस्ला कंपनीची वेगात धावणारी चालकविरहित मोटार रस्त्यालगत एका वळणावर झाडावर आदळल्याने मोठा अपघात झाला. या घटनेनंतर गाडीला आग लागली आणि त्यात दोघांचा होरपळून मृत्यू झाला.Teslas driverless car get an accident
अमेरिकेच्या होस्टन शहरात टेस्लाच्या चालकविरहित मोटारीचा शनिवारी अपघात झाला. ही मोटार रस्त्यालगत झाडाला धडकली आणि त्यानंतर मोटारीस आग लागली. यावेळी मोटारीत दोघे होते आणि त्यात दोघांचाही मृत्यू झाला. दुर्घटनेच्या वेळी चालकाच्या जागेवर कोणीही नव्हते. मात्र बाजूच्या सीटवर एक जण तर पाठीमागे एक जण बसला होता.
अपघाताच्या वेळी गाडीचा वेग बऱ्यापैकी होता. दुर्घटनाग्रस्त मोटार २०१९ रोजी तयार केलेली होती. वेगात धावणारी टेस्ला मोटार ही एका वळणावर अनियंत्रित झाली आणि झाडावर आदळली. अपघातानंतर मोटारीतील दोघे बाहेर येऊ शकले नाहीत.
आग नियंत्रणात आणल्यानंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. ही मोटार सेमी-ऑटोमेटेड होती.गेल्या काही दिवसांत टेस्लाच्या २७ गाड्यांना अपघात झाला आहे. या घटनांमुळे अमेरिकेतील ऑटो सेफ्टी एजन्सीने टेस्ला गाड्यांची तपासणी सुरू केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App