टेस्लाची वाहने हेरगिरीसाठी वापरल्यास कंपनीच बंद करावी लागेल… इलॉन मस्क यांचा चीनला इशारा

विशेष प्रतिनिधी

बिजींग – चीनमध्ये टेस्लाची वाहनं हेरगिरीसाठी वापरण्यात येत असतील तर तेथील आपला कारखाना बंद करण्यात येईल, असा खणखणीत इशारा अमेरिकेतील जगविख्यात टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी दिला आहे. Elon Musk warned China that Tesla will be shut down if its car used for spying

परदेशी सरकारची हेरगिरी करण्यासाठी या कारचा वापर होत असेल तर कंपनीवर त्याचे अत्यंत नकारात्मक परिणाम होतील. ही आपल्यासाठी अतिशय वाईट गोष्ट आहे. कोणतीही माहिती गुप्त ठेवणं ही आपली जबाबदारी आहे असेही मस्क यांनी स्पष्ट केले आहे.चीनच्या लष्कराने टेस्ला वाहनांमधील काही सुविधांवर निर्बंध आणल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर मस्क यांनी ही भूमीका मांडली आहे. टेस्ला वाहनांमध्ये बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांचा वापर माहिती गोळा करण्यासाठी केला जातो. याबाबत चीनच्या लष्करांनी सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

सध्या चीन ही जगातील कार उद्योगाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथील सरकार इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार प्रोत्साहन देत आहे. इथं टेस्लाच्या कारला चांगलीच मागणी आहे. याच बळावर गेल्या वर्षी टेस्लाने 721 मिलियन डॉलरचा घसघशीत नफा कमावला होता.

अमेरिकेनंतर चीन ही टेस्लाची मोठी बाजारपेठ मानली जाते. याठिकाणी टेस्ला वाहनांच्या विक्रीचा तीस टक्के वाटा आहे. इलॉन मस्क यांची कंपनी ही मूळची अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील आहे. मस्क यांनी अमेरिकेसह चीनमध्येही आपली एक प्रतिमा बनवून लोकांचा विश्वास जिंकला आहे.

Elon Musk warned China that Tesla will be shut down if its car used for spying

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*