दहाजण ठार, 35 नागरिक जखमी, दोन पोलिसांचाही जखमींमध्ये समावेश
विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्समध्ये नवीन वर्ष साजरे करणाऱ्या लोकांच्या गर्दीवर दहशतवादी हल्ला झाला. अधिका-यांनी सांगितले की, हल्लेखोराने आपले वाहन जमावाकडे वळवले आणि लोकांना चिरडून तेथून पळ काढला. या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला असून 35 जण जखमी झाले आहेत.
शहराचे महापौर, लाटोया कॅन्ट्रेल यांनी, आयकॉनिक बोर्बन स्ट्रीटवर पहाटे झालेल्या हल्ल्याचे वर्णन दहशतवादी हल्ला म्हणून केले. तर पोलिस प्रमुख ॲन किर्कपॅट्रिक यांनी सांगितले की, हल्लेखोर हा हल्ला घडवून आणण्यासाठी नरसंहार करण्याच्या उद्देशानेच आले होते.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्याची ओळख पटलेली नाही. त्याने आपला पांढऱ्या रंगाचा पिकअप ट्रक गर्दीत वळवला आणि बाहेर पडून पोलिसांवर गोळीबार केला ज्यानंतर पोलिसांनी त्याला ठार केलं. या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले. तसेच, जवळच एक स्फोटक सापडल्याचे वृत्त आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App