प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतात सगळे पुरोगामी इस्लामोफोबियाची हाकाटी पिटत असताना जगभरात विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये हिंदू द्वेष दुप्पट – चौपट नव्हे, तर तब्बल दसपटीने वाढल्याचा धक्कादायक खुलासा अमेरिकेच्या नेटवर्क कॉन्टेजियन्ट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या NCRI रिपोर्ट मध्ये केला आहे. Tenfold Increase in Hindu Hatred Worldwide!; Conspiracy is being created from Pakistan, Iran
15 सप्टेंबर 2022 ला कॅनडातील स्वामीनारायण मंदिरात काही लोकांनी घुसून तोडफोड केली. भिंतींवर भारत विरोधी नारे लिहिले. त्याआधी 19 सप्टेंबर रोजी ब्रिटन मधल्या लिस्टर शहरात शिव मंदिरात घुसून काही लोकांनी भगवे झेंडे उपसून काढले आणि मंदिरात तोडफोड केली. या घटनांमुळे जगभरातल्या हिंदू द्वेषाकडे भारतीयांचे आणि जगाचे लक्ष गेलेले दिसत आहे. पण हिंदू द्वेषाचे हे कारस्थान अधिक जुने आणि अधिक खोलवर आहे. किंबहुना या कारस्थानाची पाळेमुळे इराण आणि पाकिस्तान सारख्या इस्लामी कट्टरवादी देशांमध्ये आहेत.
गेल्या तीन वर्षांचा अभ्यास केला असता, ही बाब लक्षात आली आहे, की हिंदू विरुद्ध हिंसा आणि द्वेष याच्या घटनांमध्ये दसपटीने वाढ झाली आहे. 3 वर्षांपूर्वी वर्षभरात साधारण 10 ठिकाणी हिंदू विरुद्ध हिंसाचार व्हायचा. पण आता हेच प्रमाण 100 पर्यंत जाऊन पोहोचले आहे.
अमेरिकेतील नेटवर्क कॉन्टेजियन रिसर्च इन्स्टिट्यूटने अर्थात NCRI यासंबंधीचा अभ्यास करून रिपोर्ट तयार केला आहे. सोशल मीडियावर यहुदींविरोधात जी मीम्स शेअर केली जातात, तशीच मीम्स हिंदू विरोधात शेअर केल्यानंतर त्याचा अभ्यास जुलै 2022 मध्ये संबंधित इन्स्टिट्यूटने केला आहे. याचे निष्कर्ष वॉशिंग्टन डीसी मध्ये NCRI इन्स्टिट्यूटचे सह संस्थापक जोएल फिंकेलस्टीन यांनी 21 सप्टेंबर 2022 रोजी एका कार्यक्रमात शेअर केले. अमेरिकी काँग्रेसमन हाँक जॉन्सनने हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते.
या कार्यक्रमात जोएल फिंकेलस्टीन यांनी स्पष्ट केले की, 3 वर्षात हिंदूं विरुद्ध द्वेषाच्या हिंसक घटना 1000% वाढल्या आहेत. सोशल मीडियात यहुदींशी मिळते जुळते हिंदू विरोधी मिम्स शेअर केले जात आहेत. जगभरातील अनेक इस्लामिक कट्टरवादी देश या कारस्थानात सामील आहेत त्यामुळेच अमेरिकेसह युरोप आणि अन्य देशांमध्ये हिंदू विरोधी नफरत द्वेष आणि हिंसाचाराला बळ मिळते आहे.
NCRI ने 4 सोशल मीडिया प्लेटफॉर्म आणि तीन पद्धतीने या सर्व बाबींचे अनालिसिस केले आहे. त्यानंतरच वास्तववादी रिपोर्ट तयार केला आहे. हिंदू विरुद्ध सर्वाधिक नफरत आणि द्वेष पसरवणाऱ्या चार सोशल मीडिया साइट्स प्लॅटफॉर्म शोधून काढले आहेत.
Twitter : 23.8 कोटी युजर्स, Telegram Messenger : 70 कोटी युजर्स, 4Chan : अमेरिका आणि युरोपमध्ये 1825 वयोगटातील युवकांमध्ये सर्वाधिक वापरली जाणारी इमेजबोर्ड वेबसाइट, ज्याचे 2.2 कोटी यूजर्स आहेत. यातून इमेज आणि मिम्स तयार करून ती शेअर केली जातात, Gab : ही एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे ज्याचे युजर्स 40 लाख पेक्षा अधिक आहेत.
अर्थात वर उल्लेख केलेल्या सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मधून सर्वच युजर्स हिंदू द्वेष पसरवतात अशी वस्तुस्थिती नसल्याचे देखील रिपोर्टमध्ये स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App