वृत्तसंस्था
काबूल : तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा करताच पुन्हा एकदा येथील चित्र पूर्णपणे बदलले आहे. यावेळचा कारभार 1990 च्या दशकापेक्षा थोडा वेगळा आहे. यावेळी मुली आणि महिलांना शिक्षण आणि काम करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. पण तालिबान कॅमेऱ्यासमोर जो मोकळेपणा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, वास्तवात तसे अजिबात नाहीये.taliban ruled afghanistan this Is How Students Get University education veil in class between boys and girls
काबूलमधील इब्न-ए-सीना विद्यापीठातून काही फोटो समोर आले आहेत, ज्यात मुले आणि मुली एकाच वर्गात बसलेले आहेत, परंतु त्यांच्यामध्ये एक पडदा आहे. शिक्षणासाठी येणारी मुले पारंपरिक वेशात, तर मुलींनी बुरखा घातलेला आहे.
तालिबानच्या नियमांनुसार, देशात राहणारे पुरुष पाश्चात्य सभ्यतेप्रमाणे पँट-शर्ट घालू शकत नाहीत. त्यांना कुर्ता घालणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे बुरखा किंवा अबाया घालण्याचा नियम स्त्रियांनाही लागू आहे. यापूर्वी रविवारी तालिबानने विद्यापीठांमध्ये शिक्षण कसे होईल हे सांगितले होते.
तालिबानने यासंदर्भात एक दीर्घ दस्तऐवज जारी केला आणि म्हटले की, महिला आणि पुरुषांना स्वतंत्रपणे बसावे लागेल. त्यांच्यामध्ये नक्कीच पडदा असेल. याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. यासोबतच महिलांना फक्त महिला शिक्षिकाच शिकवणार असल्याचे ठरवण्यात आले आहे. पण जर त्या उपलब्ध नसतील, तर त्यांना चांगल्या चारित्र्याचे ‘वृद्ध पुरुष’ शिकवतील.
एकीकडे, तालिबानने महिलांना म्हटले की, त्या कामावर परत येऊ शकतात. पण दुसरीकडे त्याने त्यांच्यासाठी मेहरमदेखील अनिवार्य केले आहे. याचा अर्थ ‘पुरुषांबरोबर’. म्हणजेच कोणत्याही मेहरम (पुरुष साथीदार) शिवाय ती घराबाहेर पडू शकत नाही. पण ज्या स्त्रिया विधवा आहेत, ज्यांना वडील किंवा मुलगा नाही, त्या कोणाबरोबर बाहेर जातील? अशा महिलांना तालिबानने घरीच बसायला सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App