विशेष प्रतिनिधी
काबूल : अफगणिस्थानातील सरकारविरुध्द लढण्यासाठी पाकिस्तानने तालीबानचे भूत उभे केले. नुकत्याच झालेल्या सत्तासंघर्षातही तालीबान्यांना पाठिंबा दिला होता. मात्र, आता हे तालीबानचे भूत पाकिस्तानवरच उलटले आहे. डुरंड लाईनवर तालीबानी सैन्याने पाकिस्तानी सैन्याला चोप देऊन पळवून लावले.Taliban ghost haunts Pakistan, Taliban beat Pakistani troops on Durand Line
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवरील ‘डुरंड लाईन’वर पाकिस्तानने कुंपण घालण्याचा प्रयत्न केला, मात्र, तालिबानच्या विरोधामुळे पाकिस्तानी लष्कराला आपली हत्यारे आणि साहित्य जागच्या जागी टाकून पळ काढावा लागला.
काही दिवसांपूर्वी तालिबान आणि पाकिस्तानी लष्करादरम्यान चकमकीचाही प्रसंग उद्भवला होता. ताज्या घटनेत अफगाणिस्तानातील निमरोज प्रांतातील चार बोर्झाक जिल्ह्यात तालिबान्यांनी पाकिस्तानी लष्कराला पळवून लावले.
अफगाणिस्तानातील प्रसिद्ध पत्रकार बिलाल सरवारी यांनी तालिबानचा हवाला देत ही माहिती दिली. पाकिस्तानी लष्करानं पश्चिम अफगाणिस्तानातील चार बोर्झाक जिल्ह्यात कुंपण घालायचा प्रयत्न केला. परंतु, तालिबाननं मोठ्या संख्येत आपलं सैन्य इथं पाठवलं. यानंतर भेदरलेले पाकिस्तानी सैनिक इथून अक्षरश: पळून गेले.
कुंपण उभारण्यासाठी आणलेली वेगवेगळी उपकरणं त्यांना जागीच सोडावी लागली.दिवसेंदिवस ‘डुरंड लाईन’वरून तालिबान आणि पाकिस्तानमधील वाद वाढत चाललाय. तालिबाननं अफगाण सीमेवर पाकिस्ताननं घातलेल्या कुंपणावर तीव्र आक्षेप व्यक्त करत थेट युद्धाची धमकी दिली आहे.
तालिबानकडून डुरंड रेषेवरील पाकिस्ताननं उभारलेलं कुंपण पाडण्यात आलंय.’डुरंड लाईन’ या एकमेव मुद्द्यावर अफगाणिस्तानातील माजी नागरी सरकार आणि तालिबान यांच्यात एकमत होतं. तालिबानला सुरुवातीपासूनच पाकिस्तान – अफगाणिस्तानमधील सीमा असलेली ‘डुरंड लाईन’ मान्य नाही.
अफगाणिस्तानचे क्षेत्र सध्याच्या सीमेच्या पलीकडे असल्याचा दावा तालिबाननं केला आहे. अफगाणिस्तानातील बहुसंख्य पश्तून आणि तालिबान्यांनी डुरंड रेषेला अधिकृत सीमारेषा मानण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.
अफगाण सरकार लवकरच या विषयावर आपली अधिकृत भूमिका जाहीर करेल, असं वक्तव्य तालिबानचा सर्वोच्च प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद यानं अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर लगेचच जाहीर केलं होतं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App