विशेष प्रतिनिधी
काबूल – तालिबानने अफगाणिस्तानमधील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या कंदहारवर ताबा मिळविला आहे. कंदहार, हेरत व हेलमंडमधील लष्करगाह ही तीन मोठी शहरे मुठीत आल्याने तालिबान्यांचा हा सर्वांत मोठा विजय मानला जात आहे. Taliban captures kandhar city once again
कंदहारमध्ये पूर्वी तालिबानचा उदय झाला होता. आज पुन्हा हे अति महत्त्वाचे शहर त्यांच्या नियंत्रणात आले आहे. त्यांनी गव्हजर्नरचे कार्यालय व अन्य इमारतींवर ताबा मिळविला. त्यावेळी गव्हर्नर आणि अन्य अधिकाऱ्यांनी पळ काढला. कंदहारमधील तुरुंगावर हल्ला करून तेथील बंदी दहशतवाद्यांना तालिबान्यांनी मुक्त केले.
महिलांचे हक्क हिरावून घेणे, सार्वजनिक फाशी देणे यासह देशात पुन्हा तालिबान्यांचे दडपशाहीचे व पाशवी सरकार सत्तेवर येण्याच्या भीतीने हजारो अफगाण नागरिक त्यांची घरे सोडून पळ काढीत आहेत.
अमेरिकेचे सैन्य मायदेशी परतल्यानंतर येथील ३४ पैकी १२ प्रांतीय राजधान्यांवर तालिबानचे वर्चस्व निर्माण झाले आहे. देशाच्या दोनतृतीयांश भागावर तालिबान्यांचा धुमाकूळ सुरू आहे.
हेरतमध्ये तालिबानी दहशतवादी ऐतिहासिक ‘ग्रेट मॉस्क’कडे धाव घेत सरकारी इमारत ताब्यात घेतली. यावेळी तेथे तुरळक गोळीबार झाला तर उर्वरित शहरात स्मशान शांतता होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हेरत गेल्या दोन आठवड्यापासून दहशतवादी हल्ल्यावला सामोरे जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App