स्थानिक लोकांमधून होतोय विरोध; विद्यार्थीनींसह शिक्षकांनाही करण्यात आली आहे सक्ती
प्रतिनिधी
पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीरमधील स्थानिक प्रशासनाने तेथील शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थींनी आणि शिक्षिकांसाठी तालिबानी फरमान काढल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी विद्यार्थींनींनी हिजाब परिधान करण्याची सक्ती करण्यात आली आहे. एवढेच नाहीतर हिजाब परिधान न केल्यास त्यांना शिक्षेला सामोरं जावे लागणार आहे. Students teachers forced to wear hijab in Pakistan Occupied Jammu and Kashmir
तालिबानी पद्धतीने काढण्यात आलेल्या या फरमानामुळे स्थानिक विद्यार्थींनींमध्ये संतापाची भावना आहे. हा आदेश म्हणजे येथील सरकारची तालिबानी विचारसरणी असल्यचं बोललं जात आहे. पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे स्थानिक पातळीवर सरकार आहे. या सरकारे शेजारील राष्ट्र असलेल्या अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीनुसार काम करण्याचे ठरवल्याचे दिसत आहे.
पाकिस्तानमध्ये होळी साजरी करणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यात १५ जण जखमी
पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये अशाप्रकारचा आदेश देऊन त्याची अंमलबजावणी करण्याची सक्ती करण्यामागे पीटीआयचा नेमका कोणता हेतू आहे, याबाबत स्थानिक पातळीवरील लोकांमध्ये विविध चर्चा आहेत. काहींचे म्हणणे आहे की हे सरकारही तालिबानप्रमाणे इस्लामवाद दाखवण्यास आतूर आहे. विद्यार्थींनीबरोबरच शिक्षिकांनाही हा नियम लागू आहे, प्रशासनाकडून तसा आदेश काढण्यात आला आहे.
अनेक स्थानिक लोकांनी पीटीआय सरकारच्या या आदेशाला विरोध दर्शवत, चुकीचा निर्णय असल्याचे सांगितले आहे. एका स्थानिक पत्रकार महिलेनेही या आदेशावर नाराजी व्यक्त केली असून, महिलांना त्यांच्या आवडी-निवडीचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असायला हवे. असे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App