येमेनमध्ये चॅरिटी इव्हेंटमध्ये चेंगराचेंगरी, 85 ठार, हुथी सैन्याने गर्दीवर नियंत्रणासाठी केला गोळीबार

वृत्तसंस्था

सना : येमेनची राजधानी सना येथे रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी जकात अर्थात आर्थिक मदत वितरणाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीमुळे 85 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर 322 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींपैकी 13 जणांची प्रकृती गंभीर आहे. हुथी सैन्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या गृह मंत्रालयाने सांगितले की, स्थानिक प्रशासनाच्या मदतीशिवाय हा कार्यक्रम तेथील व्यापाऱ्यांनी आयोजित केला होता. यामध्ये गोरगरीब नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. Stampede at charity event in Yemen, 85 dead, Houthi forces open fire to control crowd

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हुथी सैनिकांनी हवेत गोळीबार केला, त्यामुळे वीज तारांमध्ये स्फोट झाला. या स्फोटाने घाबरलेले लोक इकडे तिकडे धावू लागले आणि एकमेकांना चिरडत गेले. दोनच दिवसांनी ईद येणार आहे, त्या पार्श्‍वभूमीवर जनतेला ही आर्थिक मदत दिली जात होती.

2 किमीपेक्षा जास्त लांबीच्या लाईन्स होत्या

येमेन मीडियानुसार, अपघाताच्या वेळी किती लोक उपस्थित होते हे अद्याप कळू शकलेले नाही. ज्या ठिकाणी आर्थिक मदत दिली जात होती. तो एक छोटासा रस्ता होता. जवळपास 2 किमीची लांबलचक लाईन होती. ठिकठिकाणी आर्थिक मदत केली जात होती. त्यामुळे लोकांना आधी पोहोचण्याची घाई होती. व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये लोक मोठ्या संख्येने पोहोचल्याचे दिसत आहे.

हुथी सैन्याने घटनेसाठी आयोजकांना धरले जबाबदार

मंत्रालयाचे प्रवक्ते ब्रिगेडियर अब्दुल-खलेक अल-अघारी यांनी चेंगराचेंगरीसाठी कार्यक्रमाच्या आयोजकांना जबाबदार धरले. स्थानिक प्रशासनाशी बोलून हा धर्मादाय कार्यक्रम केला असता, तर अशी घटना घडली नसती, असे ते म्हणाले.

या घटनेनंतर लगेचच हुथी बंडखोरांनी हा कार्यक्रम आयोजित केलेल्या शाळेला पूर्णपणे सीलबंद केले. गृह मंत्रालयाने सांगितले की, कार्यक्रमाच्या दोन आयोजकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

Stampede at charity event in Yemen, 85 dead, Houthi forces open fire to control crowd

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात