श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा अखेर राजीनामा ; नव्या मंत्रिमंडळाची लवकरच होणार स्थापना


वृत्तसंस्था

कोलंबो : श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांनी पदाचा राजीनामा दिला. तसेच श्रीलंकेतील ३६ तासांचा कर्फ्यू आज उठवला. श्रीलंकेत सार्वजनिक वाहतूक सामान्य सेवा आता पूर्ववत केली आहे.Sri Lankan PM resigns New cabinet formed soon

आर्थिक संकटाच्या विरोधात सरकारविरोधी निदर्शने केल्यानंतर, पंतप्रधान महिंदा राजपक्षे वगळता श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाने रविवारी रात्री सामूहिक राजीनामा दिला होता. परंतु राजपक्षे यांनी राजीनामा दिला नव्हता. दरम्यान राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आता देश वाचविण्यासाठीं काय भूमिका घेतात ? याकडे लक्ष लागले आहे.नवीन मंत्रिमंडळााबाबत राजपक्षे आज विशेष वक्तव्य करू शकतात. दरम्यान राष्ट्रपती आज कॅबिनेट मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारतील अशी अपेक्षा आहे. गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेतील लोकांचा राग शांत करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमध्ये नवीन मंत्रिमंडळाची स्थापना होण्याची शक्यता आहे. रविवारी सर्व २६  मंत्र्यांनी पदांचा राजीनामा दिला होता.

Sri Lankan PM resigns New cabinet formed soon

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात