वृत्तसंस्था
किव्ह : युक्रेन आणि रशियामधील युद्ध ४०व्या दिवशीही सुरुच आहे. नरसंहाराची भयावह दृश्य समोर येत आहेत. युक्रेनची राजधानी किव्हपासून सुमारे ३७ किलोमीटरवरच्या बुचा शहरामधील भयावह परिस्थिती समोर आली आहे. जागोंजागी मृतदेहांचा खच पडला आहे.Russia’s horrific massacre in the Ukrainian city of Bucha; The corpse fell near the church cemetery
एका चर्चजवळ सुमारे ४५ फुट लांब स्मशानभूमी दिसली आहे. एका खाजगी अमेरिकन कंपनीनुसार सॅटेलाइट फोटोंमध्ये बुचा शहरामध्ये चर्चजवळ ४५ फुट लांब स्मशानभूमी दिसली. रशियन सैन्य बुचा शहरातून मागे हटल्यानंतर ही स्मशानभूमी आढळली. रस्त्यावर मृतदेहाचा खच आढळला.
युक्रेनच्या सैन्याने कीव्हवर पुन्हा ताबा मिळवला. मॅक्सर टेक्नॉलॉजीजने सांगितले की, चर्चच्या सामूहिक कबरीसाठी खोदकाम केल्याचं १० मार्चला आढळले होते. ३१ मार्च रोजी बुचाच्या चर्चजवळ ४५ फूट लांब सामूहिक कबर आढळली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App