वृत्तसंस्था
कोलंबो : श्रीलंकेत लवकरच रामायण काळातील स्थळे विकसित केली जातील. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज आणि ट्रस्टच्या उच्च पदाधिकाऱ्यांनी श्रीलंकेतील रामायण ट्रेल प्रकल्पाचे उद्घाटन केले. या वेळी त्यांच्यासोबत श्रीलंकन संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अबेवर्धने, क्रिकेटपटू सनथ जयसूर्या, श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त संतोष झा आणि अनेक खासदार आणि श्रीलंका सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विकसित करायच्या ठिकाणांपैकी प्रमुख म्हणजे जिथे रामाने पाय ठेवले होते, जिथे सीतेला बंदिस्त केले होते. याशिवाय हनुमान आणि कुंभकर्ण गुहा आणि रावणाचे तपश्चर्येचे ठिकाणही विकसित केले जाणार आहे. दुसरीकडे भारतीय दूतावासात उच्चायुक्त संतोष झा यांनी स्वामी गोविंददेव गिरी महाराज आणि ट्रस्टच्या उच्च अधिकाऱ्यांचे स्वागत केले. यादरम्यान, रामायण ट्रेलचा विकास, लोकांतील परस्पर संपर्क आणि श्रीलंकेतील आर्थिक विकासाला चालना देण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यात आली. श्रीलंकेत सध्या असलेल्या रामायण ट्रेलच्या एकूण ५२ स्थळांचा श्रीलंका सरकारच्या सहकार्याने विकास केला जाईल.Sri Lanka Government to develop 52 Ramayana sites; Inauguration of Ramayana Trail Project
रामबोध हनुमान मंदिरात पूजा
स्वामी गोविंददेव गिरी यांनी मंगळवारी हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्रीलंकेतील कँडीजवळील डोंगराळ भागात असलेल्या रामबोध हनुमान मंदिरात विशेष पूजा केली. या मंदिरात हनुमानांची १८ फूट उंच मूर्ती आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App