विशेष प्रतिनिधी
सिमला – भारतीय कंपनी पॅनाशिया बायोटेकने रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीचे उत्पादन सुरु केले आहे. ‘स्पुटनिक व्ही’ लसीचे वर्षाला दहा कोटी डोस पॅनाशिया कंपनी तयार करणार आहे. त्यामुळे भारतातील लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे. Sputanic vaccine production started in India
कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशींनंतर रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीला भारताने आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. रशियातून या लसीचे डोस भारतात आल्यानंतर १४ मेपासून या लसीचे डोस देण्यास सुरुवात झाली आहे.
पॅनाशिया बायोटेक कंपनीने हिमाचल प्रदेशातील बद्दी येथील कारखान्यात ‘स्पुटनिक व्ही’ लसीची निर्मिती सुरु केली आहे. या कारखान्यात तयार करण्यात आलेल्या लशींची पहिली खेप रशियाच्या गामालेया केंद्रात पाठवली जाणार आहे. तिथे या लसीची गुणवत्ता पारखली जाणार आहे. ‘‘स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती भारतात सुरु झाल्याने त्याचा भारताला फायदा होणार आहे. लसीकरण मोहीम वेगाने झाल्यास जनजीवन सुरळीत होण्यास मदत होईल,’’ असे पॅनाशिया बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जैन यांनी म्हटले आहे.
Sputanic vaccine production started in India
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App