वृत्तसंस्था
बीजिंग : चिनी कम्युनिस्ट पक्षाची सर्वोच्च बैठक अर्थात चायनीज काँग्रेस सध्या सुरू आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भाषणात हॉंगकॉंग, तैवान हे नेहमीचे विषय तर आलेच पण त्याहीपेक्षा त्यांनी आपल्या भाषणाचा रोख चीनच्या मेक ओव्हर वर ठेवला आहे. shi Jinping’s speech emphasizes China’s make over
चीनला आपल्या जागतिक प्रतिमेविषयी चिंता वाटत आहे. या पार्श्वभूमीवर चीनला संपूर्ण जगाला चिनी सभ्यतेची गोष्ट सांगायची आहे. चीन हा जगातला एक पुरातन संस्कृती, सभ्यता आणि जीवनशैली असलेला देश आहे. आधुनिक जगातही तो एक विश्वासार्ह, प्रेमळ आणि संपूर्ण जगाच्या आदराला पात्र ठरणारा देश आहे, हे आपल्याला जगाला पटवून द्यायचे आहे, असे शी जिनपिंग यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले आहे. चिनी संस्कृती जुनी आहे. या संस्कृतीत मानवतेला देण्यासाठी बरेच आहे. आधुनिक जगात सांस्कृतिक सॉफ्ट पॉवरचे महत्व आपण ओळखले पाहिजे आणि चिनी संस्कृतीची सभ्यतेची आणि जीवनशैलीची गोष्ट जगाला सांगितली पाहिजे. जगावर त्याचा प्रभाव पडला पाहिजे, असे शी जिनपिंग म्हणाले आहेत.
चायनीज काँग्रेसच्या बैठकीत शी जिनपिंग यांच्या नेतृत्वावर पुढच्या पाच वर्षांसाठी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होईल. पक्षाची व्युहरचनाच तशी केली आहे. मध्यंतरी शी जिनपिंग यांच्याविरुद्ध बंडाळी होत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु ती चिन्हे आता मिटून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग यांनी अधिक आत्मविश्वास पूर्ण भाषण केले आहे.
हॉंगकॉंग तैवान कब्जावर भर
हॉंगकॉंग चीनच्या पूर्ण वर्चस्वाखाली आला आहे. एक देश – दोन राजकीय व्यवस्था याचे ते उत्तम उदाहरण ठरते आहे. हाँगकाँग मध्ये चिनी देशभक्त सरकार स्थापन होत आहे. यावर शी जिनपिंग यांनी भर दिला आहे. त्याचप्रमाणे वन चायना पॉलिसीनुसार तैवानवर कब्जा मिळवण्यासाठी लष्कराचा पर्याय कायमच खुला असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.
प्रतिमा बदलावर भर
पण शी जिंगपिंग यांच्या भाषणातला एक महत्त्वाचा मुद्दा चीनच्या मेक ओव्हरचा राहिला आहे. चीन जगातला आक्रमक आणि उपद्रवमूल्य मोठे असलेला देश आहे. चीन नेहमी शेजारच्या देशांना त्रास देतो. आर्थिक बोजाखाली तो छोटे देश दाबून टाकतो, अशी चीनची जागतिक प्रतिमा बनली आहे. या प्रतिमेची चीनला चिंता वाटते आहे आणि ही प्रतिमा बदलण्यासाठी जागतिक पातळीवर चीनला मेक ओव्हरची गरज असल्याचे दिसून येत आहे. त्याचेच प्रतिबिंब शी जिनपिंग यांच्या भाषणात पडलेले दिसले आहे. आणि म्हणूनच त्यांनी चीन हा जुनी संस्कृती परंपरा सभ्यता असलेला देश असल्याचा उल्लेख करून चीनची सांस्कृतिक सॉफ्ट पॉवर जगाला दिसली पाहिजे, असे म्हटले आहे. अर्थात येथेही सॉफ्ट पॉवर द्वारे जगावर चीनचे वर्चस्व गाजवण्याचा मुद्दा प्रभावी ठरलेला दिसतो आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App