रशियात विद्यार्थ्याने केला स्वतःस स्फोटाने मारण्याचा प्रयत्न

विशेष प्रतिनिधी

 मॉस्को – रशियातील एका सनातनी शाळेतील पदवीधर युवकाने स्फोट घडवून स्वतःस मारण्याचा प्रयत्न केला. यात त्याच्यासह १५ वर्षांचा विद्यार्थी जखमी झाला.गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मॉस्कोच्या दक्षिणेकडे सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या सेर्पुखोव शहरातील व्हीवेदेन्सकीय व्लादिच्नी कॉन्व्हेंट शाळेत हा प्रकार घडला.Russian student tried to explode himself

त्यानंतर शाळेतील कर्मचाऱ्यांची सुटका करावी लागली. इतर जखमींबाबतच्या माहितीची खातरजमा केली जात आहे. अनेक वृत्तसंस्थांनी सात जण जखमी झाल्याचे वृत्त दिले आहे. हा प्रकार नेमका कसा घडला याचा आणखी तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.



त्यामुळे हा आत्मघाती हल्ला आहे का हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.सरकारी वकीलांनी घटनास्थळी काय स्थिती आहे हे दाखविणारा व्हिडिओ सोशल मिडीयावर पोस्ट केला. चौकशी समितीने तेथे गुप्तहेर पाठविले आहेत.गेल्या काही वर्षांत रशियात शालेय विद्यार्थ्यांकडून हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.

Russian student tried to explode himself

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub