विशेष प्रतिनिधी
दुबई – अफगाणिस्तानातून हजारो नागरिकांना बाहेर काढण्यात अमेरिकेबरोबरच कतारने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कतारचे वॉशिंग्टन आणि तालिबानशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे काबूलच्या भवितव्याची वाटचाल निश्चिात करण्यासाठी कतार महत्वाची भूमीका अदा करण्याची शक्यता आहे.Quatar help to evacuate people from afhganistan
अमेरिकेने म्हटले की, १४ ऑगस्टनंतर रविवारपर्यंत अफगाणिस्तानातून १ लाख १३ हजार ५०० लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. कतारच्या मते, ४३ हजाराहून अधिक नागरिकांना आपल्या देशाच्या मार्गाने बाहेर नेण्यात आले.
कतारची सीमा सौदी अरेबियाला लागून आहे. तसेच इराणजवळील पर्शियन आखातात खोलवर समुद्रात कतारच्या तेलखाणी आहेत. यामार्गे काही हजारच लोक बाहेर काढले जातील, असे मानले जात होते. तत्पूर्वी १५ ऑगस्टला तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर
अमेरिकेने कतारची मदत मागितली आणि त्यापैकी ४० टक्के लोक कतारमार्गेच बाहेर काढण्यात आले. याचे व्हाइट हाऊसने देखील कौतुक केले आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी देखील आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी कतारला मदत मागितली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App