मालीमध्ये लष्कराने पुकारले पुन्हा बंड, अध्यक्ष, पंतप्रधानांना घेतले ताब्यात

विशेष प्रतिनिधी

माली : मालीमधील लष्कराने नऊ महिन्यांनंतर पुन्हा एकदा बंड करत हंगामी अध्यक्ष, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेची आफ्रिकन युनियन आणि संयुक्त राष्ट्रांनी गंभीर दखल घेतली असून या तिघांना तातडीने सोडून देण्याचे आवाहन केले आहे. मालीमधील या घडामोडीमुळे नागरी सरकार स्थापन करण्याच्या लष्कराच्या हेतूंवर संशय व्यक्त होतो आहे President of Mali arrested by police

या तिघांना लष्कराच्या मुख्यालयात ठेवण्यात आले आहे. म्यानमारमध्ये नऊ महिन्यांपूर्वी लष्कराने बंड करत तत्कालीन अध्यक्ष इब्राहिम बोबाकार कैटा यांना राजीनामा देण्यास भाग पाडले होते. त्यानंतर लष्कराने नागरी सरकार स्थापन करण्याचे आश्वाभसन देत बाह एनदाव यांची अध्यक्षपदावर, तर मोक्टर ओएन यांची पंतप्रधानपदावर हंगामी नियुक्ती केली होती.

१८ महिन्यांमध्ये नागरी सरकार स्थापन करण्याची त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, काल मंत्रिमंडळात खातेवाटप होऊन लष्कराने नियुक्त केलेल्या दोन सदस्यांना वगळण्यात आल्यानंतर लष्कराने अध्यक्ष आणि पंतप्रधानांसह संरक्षण मंत्र्यांनाही ताब्यात घेतले.

President of Mali arrested by police

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात