वृत्तसंस्था
लिमा : पेरूच्या राष्ट्राध्यक्ष डायना बोलूर्ते यांच्याविरोधातील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. पोलिसांनी शुक्रवारी उशिरा राष्ट्रपती भवनावर छापा टाकला. याशिवाय डायना यांच्या खासगी घरावरही छापा टाकण्यात आला. डायना यांच्याकडे लक्झरी ब्रँड रोलेक्ससह इतर काही मौल्यवान घड्याळे असल्याचा आरोप आहे. त्यांची संख्या 14 असल्याचे सांगण्यात येत आहे.Police Raid Peru’s Presidential Palace; President Diana accused of possessing 14 precious watches; Corruption investigation
रोलेक्स केस
पेरूमधील राष्ट्रपतींच्या या भ्रष्टाचार प्रकरणाला ‘रोलेक्स केस’ म्हटले जात आहे. काही दिवसांपासून विरोधी पक्ष राष्ट्रपतीपदावर कायम राहण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि काही तासांनंतर प्रेसिडेंशियल पॅलेस आणि डायना यांच्या खाजगी घरावर छापे टाकण्यात आले.
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, डायना यांच्या खाजगी घराची झडती घेण्यासाठी पोलिस पोहोचले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी दरवाजा उघडला नाही. यानंतर तो पाडण्यात आला. अलीकडच्या काही महिन्यांत डायना यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारची महागडी रिस्ट घड्याळे परिधान करताना दिसल्या. यानंतर विरोधकांनी त्यांच्याविरोधात आघाडी उघडली.
एकीकडे विरोधक हल्लाबोल करत असताना दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष डायना स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या म्हणाल्या- माझ्याकडे जे काही आहे, ते मी मेहनतीने कमावले आहे. मी जेव्हा राष्ट्रपती भवनात आले, तेव्हा माझे हात स्वच्छ होते आणि जेव्हा मी येथून निघून जाईल तेव्हाही माझे हात स्वच्छ राहतील. हे वचन मी देशातील जनतेला दिले होते.
डायना यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे – पोलिस शोधासाठी आले होते. या काळात कोणतीही घटना घडली नाही. राष्ट्रपतींचे वकील मातेओ कास्टंडा म्हणाले – पोलिसांची संख्या खूप जास्त होती आणि असे दिसते की ते फक्त नाटक रचण्यासाठी आले होते. त्यांनी सुमारे 10 घड्याळांची छायाचित्रे घेतली. कदाचित पुढच्या महिन्यात ते राष्ट्रपतींची चौकशी करू शकतात. यासाठी आम्ही तयार आहोत.
छाप्याबाबत पंतप्रधान गुस्तावो एड्रियनजेन म्हणाले – ज्या दिवशी छापा टाकण्यात आला, तो सुट्टीचा दिवस होता. राष्ट्रपतींच्या सन्मानाचा अवमान करण्याचे हे षडयंत्र आहे असे मला वाटते. न्यायमंत्री एडुआर्डो अरेना म्हणाले- हा छापा स्वतःच बेकायदेशीर आहे. पेरू राजकीय अस्थिरतेचा बळी ठरला आहे. येथे अनेक अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि शेवटी त्यांना राजीनामा द्यावा लागला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App