इस्राईलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची गच्छंती अटळ, सत्ता स्थापनेसाठी सर्व विरोधक एकत्र


विशेष प्रतिनिधी

जेरुसलेम : गेल्या बारा वर्षांपासून पंतप्रधानपदावर असलेल्या बेंजामिन नेतान्याहू यांना प्रथमच प्रबळ आव्हान निर्माण झाले आहे.PM nentyanahu is in trouble

नेतान्याहू यांच्याविरोधात सर्व विरोधक अखेर एकत्र आले असून ते लवकरच सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. येश अतिद पार्टीचे नेते याएर लापिड यांनी आठ पक्षांच्या आघाडीची घोषणा केली.



नेत्यान्याहू यांना जर राजीनामा द्यावा लागला तर आखातातील राजकीय संदर्भ बदलण्याची मोठी शक्यता राजकीय विश्लेषकांन वाटते. त्यांच्या मते सध्याच्या परिस्थीतीत विरोधकांची एकी कायम राहिल्यास नेत्यान्याहू यांना पायउतार होण्यास वेळ लागणार नाही.

या पक्षांमध्ये झालेल्या करारानुसार, यामिना पार्टीचे नेते नाफ्ताली बेनेट हे सुरुवातीचे काही काळ पंतप्रधानपद स्वीकारतील आणि त्यानंतर हे पद लापिड यांच्याकडे सोपवतील.

दोन वर्षांमधील चार निवडणूकांनंतरही इस्राईलमध्ये बहुमताचे सरकार निवडून न आल्याने अध्यक्षांनी विरोधकांना काल रात्रीपर्यंत सरकार स्थापनेसाठी एकत्र येण्याची मुदत दिली होती.

ती मुदत संपण्याच्या अर्धा तास आधी विरोधकांनी एकत्र येत असल्याचे अध्यक्षांना कळविले. यावर संसदेत आता मतदान होणार आहे. यामुळे आता नेतान्याहू यांची पदावरून गच्छंती निश्चिवत मानली जात आहे.

PM nentyanahu is in trouble

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात