वृत्तसंस्था
पॅरिस : जगात भारतीय नागरिक कुठेही असो, तिथे मिनी इंडिया तयार करतात. परदेशात भारत माता की जय कानावर पडते त्या वेळी मला खूप आनंद होतो. घराच्या सारखे वाटते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दोनदिवसीय फ्रान्स दौऱ्याच्या पहिल्या दिवशी मोदींनी पॅरिसमधील ला सीन म्युझिकल येथे अनिवासी भारतीयांना संबोधित केले.PM Modi’s address to Indians in Paris, where there is an Indian, there is a mini India, mentions 42-year-old relationship
ते म्हणाले, जगातील भारताची भूमिका आणि क्षमता वेगाने बदलत आहे. आज पुरवठा साखळी, हवामान बदल आणि दहशतवाद यांचा मुकाबला करण्यासाठी जग मोठ्या आशेने भारताकडे पाहत आहे. भारत ही लोकशाहीची जननी आणि विविधतेचे एक अद्वितीय मॉडेल आहे. फ्रान्सच्या दौऱ्यावर पॅरिसमध्ये पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींचे विमानतळावर लाल गालिचा अंथरुन स्वागत करण्यात आले. फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न यांनी मोदींचे स्वागत केले. दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने फ्रान्सकडून २६ राफेल-एम लढाऊ विमाने व ३ स्कॉर्पिन पाणबुड्या खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे.
फ्रान्ससोबत ४२ वर्षांचे जुने नाते
फ्रान्ससोबत माझे ४२ वर्षे जुने नाते आहे,असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सन १९८१ मध्ये आपण अलायन्स फ्रान्सचे सदस्यत्व घेतले होते, असे ते म्हणाले.
बॅस्टील डे संचलनात हवाई दलाचे नेतृत्व करणार सिंधू रेड्डी
पॅरिसमध्ये शुक्रवारी बॅस्टील दिन संचलनात मोदी प्रमुख पाहुणे आहेत. यामध्ये भारतीय हवाई दलाच्या ६८ जवानांच्या पथकाचे नेतृत्व स्क्वॉड्रन लीडर सिंधू रेड्डी करणार आहेत.यात पंजाब रेजिमेंटच्या पथकाचाही सहभाग असेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App