पवारनिष्ठ लिबरल मांडतात फडणवीसांच्या “राजकीय बळीची” कविकल्पना, पण ही खरी भाजप बळकटीकरण, एनडीए विस्ताराची मोदींची योजना!!


महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवारांना शिंदे – फडणवीस सरकार मध्ये सामावून घेतल्यानंतर शरद पवारांना अनुकूल असलेल्या लिबरल विचारवंतांच्या वर्तुळातून देवेंद्र फडणवीस यांचा “राजकीय बळी” देऊन महाराष्ट्रात सरकार बळकटीकरणाचा प्रयोग सुरू असल्याची राजकीय पुडी सोडली गेली आहे, इतकेच नाही तर, पवारांनीच राष्ट्रवादीचा “राजकीय साप” शिंदे – फडणवीसांच्या पायात सोडल्याची मखलाशी देखील काही पवारानुकूल लिबरल विचारवंत करत आहेत. Pawar loyalists liberals put devendra fadnavis in the dock, but that is not the real case of BJP expansion

महाराष्ट्राच्या राजकारणात कितीही उलथापालथ झाली, जनतेने आपल्या पूर्ण नाकारले तरी, आपला पराभव मान्य करायचा नाही ही पवारांची जुनी राजकीय स्टाईल आहे आणि त्या स्टाईल मधूनच वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून स्वतःला अनुकूल विचारवंतांमार्फत वेगवेगळ्या पुड्या सोडण्यामध्ये पवार माहीर आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा “राजकीय बळी” देऊन महाराष्ट्रातले सरकार बळकट करण्याची मोदी – शाहांची योजना असल्याची पुडी सोडणे हा त्यातलाच एक भाग आहे.

मोदी शाहांची मूळ योजना काय??

पण यातली वास्तविकता समजून घेतली, तर मोदी – शाहांची खेळी किती विस्तृत आहे, हे नीट लक्षात येईल. मूळात मोदी – शाहांच्या भाजपला आता जुनी काँग्रेस व्हायचे आहे. म्हणजे भाजप पक्ष संपूर्ण भारतात पाळेमुळे खोल रुजवून संघटना बळकट करायची आहे. त्यासाठी आपल्याला हवे ते डावपेच खेळण्याची आणि विरोधकांवर मात करण्याची त्यांची तयारी आहे. हा मुखर्जी – दीनदयाळ यांचा जनसंघ नाही, वाजपेयी – अडवाणी यांचा भाजप नाही, याची पक्की जाणीव विरोधकांपेक्षा स्वतः मोदी – शाहांना अधिक आहे. त्यामुळे साम दाम दंड भेद हे खऱ्या अर्थाने चाणक्याचे सूत्र मोदी – शाह वापरत आहेत. यासाठी त्यांना महाराष्ट्रातल्या कोणाही विचारवंतांनी चाणक्याचे सर्टिफिकेट देण्याची जरुरत वाटत नाही.

या लिबरल विचारवंतांनी गावठी चाणक्यांना ते सर्टिफिकेट दिले आहे तेवढे पुरेसे आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी फोडणे आणि त्याआधी शिवसेना फोडणे हा मोदी – शाहांच्या एकूण राजकीय बुद्धिबळाच्या पटावरची एक चाल आहे. अशा अनेक चाली अजून ते खेळणार आहेत. पण त्याचा नेमका आवाका येत नाही ही “पवार बुद्धीच्या लिबरल विचारवंतांची” खरी गोची आहे.



प्रादेशिक संस्थापकांची मक्तेदारी संपवली

मोदी – शाह पक्ष फोडतात म्हणजे काय करतात?? ते नेमका कोणता अजेंडा चालवू इच्छितात??, याची साधी भनकही या विचारवंतांना लागत नाही. मोदी – शाहांनी शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस फोडले म्हणजे घराणेशाही प्रादेशिक पक्षांना त्यांनी सुरुंग लावला. आपण लादू त्या नेतृत्वाला लादून घेतले पाहिजे ही प्रादेशिक पक्षांमधल्या संस्थापक नेत्यांची मक्तेदारी मोदी – शाहांनी संपवली. संस्थापक नेत्यांच्या अकर्तृत्ववान वारसांपेक्षा कर्तृत्ववान असलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भविष्यातल्या राजकारणाची संधी दिली. हे मोदी – शाहाःच्या राजकारणाचे खरे इंगित आहे. पण हे इंगितच पवार बुद्धीचे राजकीय विचारवंत समजून घेऊ शकत नाहीत. ही त्यांची मर्यादा आहे. पवार बुद्धीचे लिबरल विचारवंत काँग्रेस सेंट्रीक राजकारणातूनच भाजपच्या विस्तृत – व्यापक राजकारणाचा विचार करतात आणि त्यामुळे त्यांचे सगळे अंदाज आणि विश्लेषण हे काँग्रेस स्टाईलचे ठरते.

 फडणवीस यांना “मोठे” का केले असते??

आता ही साधी गोष्ट आहे, की देवेंद्र फडणवीस यांचा “राजकीय बळी” देऊन जर मोदी – शाहांना भाजपचा विस्तार आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी बळकट करायची असती तर, फडणवीसांना उपमुख्यमंत्री करून त्यांच्याकडे सर्वात महत्त्वाची खाती देऊन सरकारचे संपूर्ण “नियंत्रक” फडणवीस अशी प्रतिमा निर्मिती तरी मोदी – शाहांनी का होऊ दिली असती?? फडणवीसांना बाजूला करणे त्यांना अवघड अजिबात नव्हते. तरी देखील त्यांनी तसे केले नाही. किंबहुना फडणवीसांनी मोदी – शाहांच्या मनातले ओळखून त्यांनी सांगितलेल्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री पद स्वीकारून स्वतःचे राजकीय भवितव्य सुनिश्चित आणि बळकट केले आहे, ही वस्तुस्थिती आहे.

पवार बुद्धीचे निष्कर्ष का चुकतात??

देवेंद्र फडणवीसांच्या हातात त्यांचे वय आहे. भविष्यात त्यांना महाराष्ट्रातच काय, पण केंद्रात आत्ता आहे त्यापेक्षा कितीतरी मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. ती फक्त सरकारमध्येच असू शकते असे नाही तर ती संघटनात्मक पातळीवरची देखील असू शकते. अशावेळी फडणवीसांचा “राजकीय बळी” देऊन मोदी – शाह काही राजकारण करू इच्छितात, अशी पुडी सोडणे, की पवारांची कदाचित गरज असू शकते पण ही पवार बुद्धीच्या महाराष्ट्रातल्या लिबरल विचारवंतांची बौद्धिक दिवाळखोरी आहे. किंबहुना हे वैचारिक आणि बौद्धिक तोकडेपण आहे.

काँग्रेसनिष्ठ राजकारणाचे कोणतेच निकष फडणवीस किंवा भाजप आणि मोदी – शाह यांच्या राजकारणाला “अप्लाय” होऊ शकत नाहीत आणि त्यांचे विश्लेषण करण्यासाठी नवे निकष या लिबरल विचारवंतांकडे उपलब्ध नाहीत. हा त्यांचा मुख्य दोष आहे. त्यामुळेच त्यांचे 2014 पासूनचे निष्कर्ष आधीच चुकले आहेत. इथून पुढचेही त्यांचे निष्कर्ष चुकतील हे सांगायला फार मोठ्या रॉकेट सायन्सचा अभ्यास करण्याची जरुरत नाही.

Pawar loyalists liberals put devendra fadnavis in the dock, but that is not the real case of BJP expansion

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात