PM Modi : पंतप्रधान मोदी दोन दिवसीय मॉरिशस दौऱ्यावर ; पोर्ट लुईस विमानतळावर जोरदार स्वागत

PM Modi

राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होणार


विशेष प्रतिनिधी

पोर्ट लुईस : PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर पोहोचले आहेत. जिथे पोर्ट लुईस विमानतळावर पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम स्वतः विमानतळावर पोहोचले होते. जिथे त्यांनी सर्वप्रथम पंतप्रधान मोदींशी हस्तांदोलन केले आणि त्यांना मिठी मारली व त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींच्या गळ्यात फुलांचा हार घालून त्यांचे स्वागत केले.PM Modi

मॉरिशसमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली. ज्यामध्ये पंतप्रधान मोदींनी काही फोटोही शेअर केले. ज्यामध्ये मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम पंतप्रधान मोदींचे स्वागत करताना दिसत आहेत.



पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी मॉरिशसला पोहोचलो आहे. विमानतळावर माझे स्वागत केल्याबद्दल मी माझे मित्र पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांचा आभारी आहे. ही भेट एका मौल्यवान मित्राला भेटण्याची आणि विविध क्षेत्रात सहकार्याचे नवीन मार्ग शोधण्याची एक उत्तम संधी आहे. आज मी राष्ट्रपती धरम गोखूल आणि पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांना भेटेन आणि संध्याकाळी एका सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित करेन.”

पंतप्रधान मोदींचा हा दौरा धोरणात्मक संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांच्यात सागरी सुरक्षा मजबूत करण्यावर चर्चा होईल. यासोबतच दोन्ही नेते अनेक करारांवर स्वाक्षरी करतील. याशिवाय, पंतप्रधान मोदी भारताकडून निधी मिळवलेल्या २० हून अधिक प्रकल्पांचे उद्घाटन देखील करतील.

PM Modi on two day visit to Mauritius; Warm welcome at Port Louis airport

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात