विशेष प्रतिनिधी
टोरांटो : कॅनडामध्ये गेल्या शतकात कॅथोलिक चर्चकडून चालविल्या जाणाऱ्या निवासी शाळांमध्ये झालेल्या अत्याचारांबाबत पोप फ्रान्सिस यांनी अधिकृत माफी जाहीर करावी,People sentiments against pope in canada
अशी मागणी कॅनडामधील मूलनिवासी कल्याण मंत्र्यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात एका निवासी शाळेच्या जागेत २१५ मुलांचे सांगाडे सापडल्याने खळबळ उडाली होती. कॅनडा सरकारने या अत्याचारांबाबत आधीच माफी जाहीर केली आहे.
१८९० मध्ये सुरु झालेल्या या शाळांमध्ये मूलनिवासी लोकांच्या मुलांना बळजबरी प्रवेश देऊन त्यांचे धर्मांतर केले जात होते आणि विरोध करणाऱ्यांवर अत्याचार केले जात होते, असे उघडकीस आले होते.
या घटनेला आता धार्मिक व वांशिक रंग येवू लागला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कॅनडातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App