Pakistan पाकिस्तानचे लवकरच 4 तुकडे पडले, तर आश्चर्य वाटायला नको; जम्मू – काश्मीरच्या माजी पोलीस महासंचालकांचा गौप्यस्फोट!!

Pakistan

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तान Pakistan मधली जफर एक्सप्रेस हायजॅक केल्यानंतर तिथली परिस्थिती चिघळली असून पाकिस्तानचे लवकरच चार तुकडे पडले, तर आश्चर्य वाटायला नको, असा गौप्यस्फोट जम्मू कश्मीरच्या माजी पोलीस महासंचालकांनी केला. पाकिस्तान मधल्या अत्यंत अस्थिर राजकीय परिस्थितीचे सविस्तर वर्णन जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी केले.

 एस. पी. वैद म्हणाले :

जफर एक्सप्रेस हायझॅक संदर्भात पाकिस्तान मधून ज्या बातम्या येत आहेत, त्या बातम्यांचा अर्थच हा आहे की बलुचिस्तान मधला पाकिस्तानी सरकारचे आणि पाकिस्तानी लष्कराचे नियंत्रण पूर्णपणे संपुष्टात आले आहे. तिथले पाच-सहा जिल्हे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या ताब्यात गेले आहेत. तिथे पाकिस्तानी लष्कराचे अस्तित्वच शिल्लक उरलेले नाही.

पाकिस्तानी कट्टरपंथी नेते मौलाना फजलूर रहमान यांनी पाकिस्तानी नॅशनल असेंब्ली मध्येच उघडपणे पाकिस्तानचे लवकरच तुकडे पडतील असे सांगितले होते. कारण पाकिस्तानी सरकार आणि पाकिस्तानी लष्कर यांचे बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनवा या प्रांतांवरचे नियंत्रण संपलेले आहे. दोन्ही प्रांतांमध्ये स्थानिक लिबरेशन आर्मी पाकिस्तानी लष्करापेक्षा प्रबळ झाल्या आहेत.

कोणत्याही क्षणी बलुचिस्तानने आपले स्वातंत्र्य जाहीर केले, तर पाकिस्तानने नॅशनल असेंब्लीच त्याला पहिली मान्यता देऊन टाकेल, असे मौलाना फजलूर रहमान म्हणाले होते. त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. त्यामुळे पाकिस्तानचे लवकरच चार तुकडे पडले तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. पंजाब, सिंध, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनवा म्हणजेच सरहद्द प्रांत असे पाकिस्तानचे चार तुकडे होऊ शकतात.

Pakistan’s army and government have lost control over Balochistan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात